Sunday, April 2, 2023
महासंवाद
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
महासंवाद
No Result
View All Result

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील – पालकमंत्री बाळासाहेब पाटील

महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६२ व्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न

Team DGIPR by Team DGIPR
May 1, 2022
in सातारा, जिल्हा वार्ता
Reading Time: 1 min read
0
जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील – पालकमंत्री बाळासाहेब पाटील
Share on WhatsAppShare on TwitterShare on Facebook

सातारा,दि.1 : विकास प्रक्रिया अधिकाधिक गतिमान करण्यास राज्य शासनाने प्राधान्य दिले आहे. त्यातून आपल्या जिल्ह्याला अधिकाधिक लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करुन जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहू, अशी  ग्वाही देऊन सहकार, पणन तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या जनतेला शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्र दिनाच्या 62 व्या वर्धापनदिनी श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल येथे पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी जिल्हाधिकारी शेखर सिंह,  राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त जगदीश पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, यांच्यासह अनेक पदाधिकारी, विविध अधिकारी, स्वातंत्र्यसैनिक आणि नागरिक उपस्थित होते.

यावेळी श्री. पाटील म्हणाले, सातारा जिल्ह्यात राबविण्यात आलेला महिला सुरक्षा पथदर्शी  उपक्रम राज्यात सर्वत्र राबविण्यात येणार आहे. सातारा शहरासह जिल्ह्यात मुली, युवती, महिला सुरक्षित व सक्षम व्हाव्यात यासाठी  6 महिन्यांपासून ‘महिला सुरक्षा पथदर्शी उपक्रम’ राबविल्यानंतर हाच उपक्रम संपूर्ण राज्यात आज महाराष्ट्र दिनी सर्व राज्यभर सुरु करण्यात येणार आहे.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त आजादी का अमृत महोत्सव या उपक्रमांतर्गत केंद्र शासनाच्या विविध योजना, उपक्रम विशेषत: स्वच्छता, बचत गट, ग्रामीण आवास योजना इत्यादीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या 75 पंचायती राज संस्थांची निवड केली आहे त्यामध्ये सातारा जिल्हा परिषदेचा समावेश आहे. कामधेनू दत्तक ग्राम योजनेंतर्गत सातारा जिल्हा परिषदेने पशुधन संदर्भात दिलेल्या उद्दिष्टाप्रमाणे शंभर टक्के पेक्षा जास्त उद्दिष्ट साध्य केल्याने सातारा जिल्हा परिषदेने महाराष्ट्रात अव्वल क्रमांक मिळविलेला आहे.

 जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन शिक्षण देण्यासाठी जिल्हा परिषदेकडील 250 प्राथमिक शाळांमध्ये स्मार्टबोर्ड क्लासरुम उपक्रम राबविण्यासाठी 404.27 लक्ष इतका निधी वितरीत करण्यात आला आहे. जिल्ह्यातील 100 अंगणवाड्यांचा दर्जा सुधारुन त्यांचे आदर्श अंगणवाड्यांमध्ये रुपांतर करण्यासाठी 149.50 लक्ष निधी वितरीत करण्यात आला आहे. जमिनीची मोजणी जलद गतीने व अचूकरीत्या करण्यासाठी नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयास 245.91 लक्षच्या रोवर मशीन युनिट खरेदीस प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यासाठी नाविन्यपूर्ण योजनेतून उंडाळे ता. कराड येथे बहुउद्देशीय कृषि प्रशिक्षण केंद्र उभारणे यासाठी 40 लक्ष, मरळी ता. पाटण येथे अद्यावत शेतकरी कृषि प्रशिक्षण केंद्र उभारणे यासाठी 99.99 लक्ष व नाडे ता. पाटण येथे बहुउद्देशीय प्रशिक्षण केंद्र व कृषि मॉल उभारणे यासाठी 75 लक्ष कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे.

साताऱ्यातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रवेश घेतलेली पहिली शाळा प्रतापसिंह हायस्कूल सातारा व सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव नायगांव, ता. खंडाळा येथील सावित्रीबाई फुले विद्यालय, नायगाव या गावांतील शाळांना शैक्षणिक सुविधा सुधारणांसाठी 1 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

पश्चिम महाराष्ट्रामध्ये वन्यजीवांकरीता अत्याधुनिक उपचार पद्धतीने सुसज्ज असे  वन्यजीव उपचार केंद्र वराडे ता.कराड येथे मंजूर झाले असून याचा फायदा सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील जखमी वन्यजीवांना तातडीचे उपचार देण्याकरीता होणार आहे. यासाठी 7  कोटी 58 लाख  रुपयांचा निधी नुकताच उपवनसंरक्षक सातारा यांच्या कार्यालयाकडे वर्ग  करण्यात आले असून वराडे येथे अत्याधुनिक  वन्यजीव उपचार केंद्र जिल्ह्याच्या वैभवात भर घालणारे आहे.

महाबळेश्वरमध्ये वाढती पर्यटकांची गर्दी लक्षात घेता तेथील डॉ.साबणे रोड येथील रस्त्यासन्मुख असलेल्या सर्व मिळकतीमध्ये एक सारखेपणा, छ.शिवाजी महाराज चौक, सुभाष चंद्र बोस चौक सुशोभिकरण करणे तसेच पेटीट लायब्ररी जीर्णोद्धार करणे तसेच डॉ.साबणे रोड जवळील मस्जिद रोड व मरी पेठ रस्त्याला जोडणारे रस्ते व गल्ल्या विकसित करणे   त्यानुसार  शासनाच्या अर्थ संकल्पामध्ये रक्कम 100 कोटी एवढ्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. तसेच जिल्ह्यातील जल पर्यटन विकासासाठी आवश्यक निधीची तरतुदही करण्यात येणार आहे.

स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्व साधारण रुग्णालयात 50 खाटांची प्रथम दर्जाची  ट्रामा केअर युनिट, तज्ञ डॉक्टरांची निदान व उपचारांची सेवा ग्रामीण जनतेस शिव आरोग्य योजनेच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यासाठी टेली मेडिसिन केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत. शंभर खाटांचे स्त्री रुग्णालयाची व नवजात शिशु रुग्णालयाची स्थापना करण्यात येणार आहे. ग्रामीण रुग्णालय खंडाळा येथील ट्रामा केअर युनिटसाठी 14 कोटी 87 लाख रुपये मंजुर करण्यात आले आहे.

जिल्ह्यात मार्च 2020 ते मार्च 2022 या 2 वर्षाच्या कालावधीत एकूण 6 हजार 700 व्यक्ती कोविडमुळे मयत झाले आहेत. मयत व्यक्तींच्या वारसांना शासनामार्फत 50 हजार इतके सानुग्रह अनुदान वितरीत करण्यात येत आहे.   6 हजार 700 पैकी 6 हजार व्यक्तींचे प्रकरणे ऑनलाईन मंजूर करण्यात आले आहेत. यापैकी 5 हजार 500 इतक्या वारसांना प्रत्येकी 50 हजार प्रमाणे एकूण 27 कोटी 50 लाख इतकी रक्कम  लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेली आहेत.

जिल्हा वार्षिक योजना अनुसुचित जाती घटक कार्यक्रम अंतर्गत 79 कोटी 82  लाख 85 हजार एवढा निधी वितरीत करण्यात आलेला आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत 27 लाख 29 हजार वितरीत  करण्यात आले आहे.  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत 13 कोटी 97 लाख 60 हजार इतका निधी वितरीत करण्यात आला आहे. यामधून 299 कामे करण्यात येणार आहेत. रमाई आवास घरकुल योजनेंतर्गत 11 कोटी 42 लाख 30 हजार निधी वितरीत करण्यात आले असून याचा 920 ग्रामीण लाभार्थ्यांना लाभ होणार आहे. अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम या अंतर्गत 1 कोटी 39 लाख 56 हजार रुपये वितरीत करण्यात आले आहे. याचा 102 लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत वैयक्तिक घरकुल योजनेंतर्गत 1 कोटी वितरीत करण्यात आले आहे. याचा 152 लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे.

जनतेस अधिकाधिक सेवा देता याव्यात याकरिता शालेय शिक्षण विभागामार्फत विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी लाभाच्या नवीन 105 लोक सेवा आज दिनांक 1 मे 2022 पासून लागू करण्यात येत आहेत, असे सांगून   महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या    शुभेच्छा दिल्या.

पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध पारितोषिकांचे वितरण

कार्यक्रमाप्रसंगी टोकीयो ऑलिंपिक 2020 मध्ये धुनुर्विद्या खेळात भारतीय संघामध्ये सहभागी होऊन जिल्ह्याचा नावलौकीक वाढविल्याबद्दल प्रविण जाधव यांना रोख रक्कम  देऊन सन्मानित करण्यात आले. ढोरोशी ता. पाटण या ग्रामपंचायतीला पंडीत दिनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार-2022 हा केंद्राचा पुरस्कराचे वितरण . तसेच 6 रास्त भाव दुाकनदार यांना आय एस ओ मानांकन पत्रही पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते देण्यात आले.

पालकमंत्र्यांच्या हस्ते सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहु महाराज परदेशी शिष्यवृत्ती योजनेच्या मार्गदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.

0000

मागील बातमी

‘पीएमपीएमएल’च्या माध्यमातून नागरिकांना उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न- उपमुख्यमंत्री अजित पवार

पुढील बातमी

सातारा जिल्हा परिषदेचा नावलौकीक यापुढेही कायम ठेवा – पालकमंत्री बाळासाहेब पाटील

पुढील बातमी
सातारा जिल्हा परिषदेचा नावलौकीक यापुढेही कायम ठेवा – पालकमंत्री बाळासाहेब पाटील

सातारा जिल्हा परिषदेचा नावलौकीक यापुढेही कायम ठेवा - पालकमंत्री बाळासाहेब पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ट्विटरवर फॉलो करा

My Tweets

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

April 2023
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
« Mar    

फेसबुक पेज लाईक करा

फेसबुक पेज लाईक करा

छायाचित्र दालन

WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.01 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.12 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (2)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)

महत्त्वाचे दुवे

  • महाराष्ट्र शासन
  • शासन निर्णय
  • मंत्रिमंडळ निर्णय
  • माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
  • महान्यूज
  • महाराष्ट्र पोलीस
  • लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

वाचक

  • 2,741
  • 12,286,132

महासंवाद विषयी

महासंवाद

महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’!

  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                sankalpsesiddhi
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.

No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.