मुंबई, दि. 5 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात राजर्षि शाहू महाराज चरित्र साधने प्रकाशन समितीचे सदस्य सचिव डॉ. विजय चोरमारे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर शुक्रवार दि. 6 मे व शनिवार 7 मे, सोमवार 9 मे व मंगळवार 10 मे 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. ज्येष्ठ पत्रकार विवेक भावसार यांनी ही मुलाखत घेतली आहे.
महाराष्ट्राच्या वैचारिक, सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक बांधणीत राजर्षि शाहू महाराज यांचं महत्त्वाचं योगदान आहे. त्यांचं कार्य समाजापर्यंत पोहचवण्याच्या उद्देशाने राजर्षि शाहू महाराज चरित्र साधने प्रकाशन समिती कार्यरत आहे. राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दीनिमित्त राजर्षि शाहू महाराजांचे लोकोत्तर कार्य, त्यांचा दूरदृष्टीपणा, समाजातील तळागाळातील लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि एकूणच महाराष्ट्राच्या जडण-घडणीतील त्यांचं योगदान याविषयी सविस्तर माहिती डॉ. विजय चोरमारे दिलखुलास या कार्यक्रमातून दिली आहे.
०००