मुंबई, दि. 8 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र ’ या कार्यक्रमात उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार संजय जोग यांनी ही मुलाखत घेतली आहे.
गुरुवार, दि. 9 जून 2022 रोजी सायंकाळी 7.30 वाजता ही मुलाखत महासंचालनालयाच्या पुढील लिंकवर पाहता येईल.
यू ट्यूब – https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR
ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR
नुकत्याच स्वित्झर्लंड येथील दावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्राने 24 कंपन्यांशी सामंजस्य करार केले आहेत. या परिषदेत महाराष्ट्राने 80 हजार कोटी रूपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार केले असून त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. याविषयी उद्योगमंत्री श्री. देसाई यांनी सविस्तर माहिती जय महाराष्ट्र या कार्यक्रमातून दिली आहे.