‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. प्रभाकर देव यांची उद्या मुलाखत

मुंबई, दि. २१ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. प्रभाकर देव यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. नांदेडचे जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी ही मुलाखत घेतली आहे.

गुरुवार, दि. २२ सप्टेंबर २०२२ रोजी सायं ७.३० वा. ही मुलाखत महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येईल.

फेसबुक https://www.facebook.com/MahaDGIPR

ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR

यू ट्यूब- https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करण्यात येत आहे. यानिमित्ताने घेण्यात आलेल्या मुलाखतीत डॉ. देव यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामाचा जाज्वल्य इतिहास सांगितला आहे. त्याचबरोबर डॉ. देव यांनी हैद्राबाद संस्थानचा कारभार, आंदोलनकर्त्यांची कार्यपद्धती, तत्कालीन सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक परिस्थिती याबद्दल विस्तृत माहिती जय महाराष्ट्र कार्यक्रमातून दिली आहे.

0000