हडस विद्यालयाच्या सहअध्यायी मित्र गटाचे राज्यपालांशी हितगुज

नागपूर, दि. २३ : नागपूर येथील हडस विद्यालयात सन १९७० मध्ये इयत्ता १० वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या सहअध्यायी मित्रांच्या गटाने आज राजभवन येथे राज्यपाल भगत‍ सिंह कोश्यारी यांची भेट घेत त्यांच्याशी विविध विषयांवर हितगुज केले.

राज्यपाल श्री. कोश्यारी यावेळी त्यांच्याशी संवाद साधतांना म्हणाले की, भारतीय संस्कार आज प्रत्येक व्यक्तीत रुजले पाहिजे. प्रत्येक व्यक्ती हा संस्कारक्षम असला पाहिजे. युवा पिढीमध्ये भारतीय संस्काराची गरज आहे. आपली संस्कृती आदर्श आहे.

या गटातील मित्र नागपूर, पुणे आणि मुंबई येथे राहत असून विविध समाजपयोगी उपक्रम राबवित आहेत. गरीब विद्यार्थ्यांना मदत करणे, पर्यावरणपूरक उपक्रम राबविणे अशा उपक्रमात योगदान देत आहेत.

सहअध्यायी १९७० च्या या गटाचे अविनाश पाठक, गणेश जिभेणकर, दिलीप पाठक, डॉ. गंगाधर गोखले, श्रीमती सरीता पवार, मनोहर भोसले, निला भोसले, संजू भुसारी, निरंजन नाझर, दिलीप भाटवडेकर, विकास जोशी, अनुरूपा पाठक, वंदना पाठक, भारती गोखले, निला भोसले, सुप्रिया भुसारी, सुवर्णा नगरकर, कल्पना पाध्ये, मधुरा पाध्ये, सविता भाटवडेकर, माधुरी भोयर व मोहिनी जोशी यांची उपस्थिती होती.                                                                       000