नागपूर, दि.6 – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आयोजित 108 व्या भारतीय विज्ञान काँग्रेसमध्ये बुधवारची (दि.4) सायंकाळ आनंदवनच्या विशेष कलावंतांनी सादर केलेल्या “स्वरानंद” या सांस्कृतिक कार्यक्रमामुळे संस्मरणीय ठरली.
कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनेने झाली. कुलगुरु डॉ. सुभाष आर. चौधरी आणि डॉ. विकास आमटे (सामाजिक कार्यकर्ते) यांची यावेळी विशेष उपस्थिती होती.
हा कार्यक्रम मराठी आणि हिंदीतील लोकप्रिय गाण्यांचे बहारदार सादरीकरण, हास्य कारंजी फुलविणारी मिमिक्री, ठेका धरायला लावणारे लोकनृत्य आणि मन आणि माना डोलावणारे संगिताविष्कारांनी उपस्थित विज्ञानप्रेमींसाठी संस्मरणीय ठरला.
“मंदिर सर्वांसाठी खुले आहे (झोनी महाराज), तुकडोजी महाराजांची भजने, बाबूजी धीरे चालना यासारखी जुनी बहारदार सिनेगिते असे संगिताविष्कार विशेष कलाकार, बाल कलाकार आणि त्यांच्या शिक्षकांनी सादर केले. तीन तासांच्या कार्यक्रमात एकही कंटाळवाणा क्षण नव्हता. मूकबधिर आणि ऐकू न येणारी मुले संगीताच्या तालावर नाचताना पाहणे अविश्वसनीय आहे. हा वाद्यवृंदाने विशेष व्यक्तिंच्या निरोगी हृदयाला समाजाशी जोडतो.
थोर समाजसेवक बाबा आमटे यांनी 1949 मध्ये महारोगी सेवा समिती, वरोरा ची स्थापना केली, कुष्ठरोगाने पीडित लोकांच्या उपचार आणि मानसिक-सामाजिक-आर्थिक पुनर्वसनासाठी स्वयंपूर्ण सामाजिक सेवा संस्था म्हणून ही संस्था महाराष्ट्र भर सुपरिचित आहे.
के. शमा पठाण, विवेक गलांडे, कुणाल, गोपी, स्वाती, साक्षी, कुणाल आणि मंगल गिवंडीकर आणि दिग्दर्शक सदाशिव ताजने, सहाय्यक दिग्दर्शक राजेश ताजने, संस्थापक आणि संकल्पना, निर्माता – डॉ विकास आमटे अशी ही मांदियाळी रसिकांना तीन तास खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरते.
00000000