जिल्ह्यात दर्जेदार रस्त्यांचे जाळे निर्माण करणार – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

0
12

नंदुरबार,दि.19 फेब्रुवारी,2023 (जिमाका वृत्तसेवा) : येत्या दोन वर्षांत जिल्ह्यात दर्जेदार रस्त्यांचे जाळे निर्माण करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी केले.

नंदुरबार येथे आमदार निधी व नगरविकास निधीतून विविध विकास कामांच्या भूमिपूजन सोहळा संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जि.प.अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित, खासदार डॉ.हिना गावित, माजी आमदार शिरीष चौधरी, लोकप्रतिनिधी सर्वश्री विजय चौधरी, हिरा उद्योग समुहाचे डॉ.रविंद्र चौधरी, विक्रांत मोरे, बांधकाम विभागाचे उप अभियंता बालाजी कांबळे, सहाय्यक अभियंता अभिजीत वळवी, यांच्यासह लोकप्रतिनीधी,नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री डॉ. गावित म्हणाले,  जिल्ह्यासह सर्व तालुक्यातील नवीन रस्ते तयार करण्यासाठी सर्व्हे करण्यात आला असून यासाठी 4 हजार कोटींची निधी लागणार आहे. या नविन रस्त्यासाठी यावर्षी 2 हजार कोटीची तरतूद केली असून पुढच्या वर्षी 2 हजार कोटी रुपयांची तरतुद केली असून येत्या दोन वर्षांत कुठल्याही व्यक्तिंना कुठल्याही  पाड्या व वस्त्यांमध्ये जाण्यासाठी बारमाही जाण्यासाठी जिल्ह्यातील सर्व रस्ते चांगले होतील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

जिल्ह्यात मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असून जिल्ह्यांचे 100 टक्के सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी उपसा सिंचन व पाटचारीद्वारे तापीचे पाणी आणण्यासाठी नियोजन सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. यासंदर्भात अधिवेशनकाळात बैठक घेण्यात येणार असून यासाठी लागणाऱ्या आवश्यक निधी आदिवासी विकास विभागातून उपलब्ध करुन देण्यात येईल. तरुणांना रोजगार देण्यासाठी लवकरच भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील तरुणांना, महिलांना स्वंयरोजगारासाठी प्रशिक्षण देवून त्यांना विविध योजनांच्या माध्यामातून लाभ देण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले.

जि.प.अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित म्हणाल्या की, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून रस्ते व इतर नागरी विकासासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

खासदार डॉ.गावीत म्हणाल्या की, आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉ.गावित यांच्या  प्रयत्नांनी नगर विकास विभागाच्या माध्यमातून व आमदार स्थांनिक विकास निधीतून या परिसरातील विविध विकास कामांसाठी निधी मंजूर केला असून माळी समाजाच्या मंगल कार्यालय निर्मितीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

या विकास कामाचे झाले भूमिपूजन

राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या आमदार निधीतून 40 लक्ष तसेच नगरविकास विभागाच्या निधीतून नंदुरबार नगर परिषद अंतर्गत प्रमाग क्र.14 व 18 मधील योगेश्वरी माता मंदीर जवळ सामाजिक सभागृह तयार करणे. गटार व पेव्हर बॉल्क बसविणे, योगेश्वरी माता मंदिरामागे संरक्षण भिंत बांधणे,गटार ड्रेनेज, जॉगिग ट्रॅक, विद्युत पोल बसविणे,रस्ते इत्यादी कामाचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.

000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here