मुंबई, दि. ८ : सैन्यातील १६ प्रकारच्या शौर्य पदक/सेवा पदक धारकांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेंतर्गत अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार राज्यातील तिघा जणांना हे अनुदान मंजूर करण्यात आले आहे.
नायक नीलेश मल्हारराव देशमुख (जळगाव) यांना विशिष्ट सेवा पदक (सेना मेडल) प्रदान करण्यात आले आहे. त्याबद्दल राज्य शासनाच्या वतीने त्यांना रुपये 12 लाख रुपये या योजने अंतर्गत मंजूर करण्यात आले आहेत. दफादार नवल भाऊसाहेब भाऊराव यांना मेन्शन इन डिस्पॅच (शौर्य पदक) प्रदान करण्यात आले आहे. त्याबद्ल रुपये 6 लाख आणि कमांडर योगेश वसंत आठवले (सातारा) यांना विशिष्ट सेवा पदक प्रदान करण्यात आले आहे. त्याबद्दल रुपये एक लाख या योजनेंतर्गत मंजूर करण्यात आले आहेत. यासंदर्भातील शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाने निर्गमित केला आहे.
०००
दीपक चव्हाण/विसंअ/