मुंबई, दि. 9 – ऑस्ट्रेलियन प्रधानमंत्री अन्थोनी अल्बानीज यांचे एक दिवसाच्या मुंबई भेटीनंतर छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई येथून दिल्लीकडे प्रयाण झाले.
यावेळी मुंबई उपनगरचे पालकमंत्री व पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा, अपर मुख्य सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर तसेच राजशिष्टाचार विभागाचे व पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.