ईद-उल-फित्र निमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

मुंबई, दि. २२ : राज्यपाल  रमेश बैस यांनी ईद-उल-फित्र (रमजान ईद) निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. रमजानच्या पवित्र महिन्यात प्रार्थना, उपवास आणि दानपुण्याच्या माध्यमातून  अंतर्मन शुद्धीला महत्व दिले गेले आहे.  आत्मकल्याणातून विश्वकल्याणाचा प्रशस्त मार्ग दाखवणारा हा महिना आहे. ही ईद सर्वांच्या जीवनात आनंद, उत्तम आरोग्य व संपन्नता घेऊन येवो व परस्पर बंधुभाव वृद्धिंगत करो अशी प्रार्थना करतो व सर्वांना, विशेषतः मुस्लिम बांधवांना ‘ईद मुबारक’ देतो,  असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

000

Governor Ramesh Bais greets people on Eid-Ul-Fitr

The Governor of Maharashtra Ramesh Bais has extended his greetings to the people on the occasion of Eid-Ul-Fitr (Ramzan Eid).  In his message, the Governor has said:

“The holy month of Ramzan attaches importance to inner purification through fasting, prayers and acts of charity.  Ramzan shows the path of welfare of the world through realization of Self.  May Eid-Ul-Fitr bring happiness, good health and prosperity to all and may it promote harmony and brotherhood.  I convey my ‘Eid Mubarak’ to all, especially to Muslim brothers and sisters.”

000