भारतीय हवाई दल-पुणे विद्यापीठादरम्यान संरक्षणविषयक सामंजस्य करार

0
12

नवी दिल्ली, दि. 2 :  संरक्षण व सामरिक विषयात संशोधन व उच्च अध्ययनासाठी ‘उत्कृष्ट अध्यासन केंद्र’ स्थापन करण्याकरिता  भारतीय हवाईदल आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठादरम्यान सामंजस्य करार झाला.

भारतीय हवाईदलाने  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासोबत  शैक्षणिक सहकार्यात पुढाकार घेत ‘उत्कृष्ट अध्यासन केंद्र’ स्थापन करण्यासाठी विद्यापीठाच्या संरक्षण व सामरिक अभ्यास विभागासोबत 29 फेब्रुवारी 2020 ला सामंजस्य करार केला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमाळकर,  एअर मार्शल अमीत  देव, एअर व्हाईस मार्शल एल.एन.शर्मा यांच्यासह  भारतीय हवाई दलाच्या शिक्षण विभागाचे आणि विद्यापीठाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

अध्यासनाला मार्शल अर्जनसिंहांचे नाव

भारतीय हवाई दलाचे मार्शल अर्जनसिंह यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून महाराष्ट्र हवाई दल आणि भारतीय हवाई दलाने या अध्यासनाला मार्शल अर्जनसिंह यांचे नाव दिले आहे.

भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्यांना या अध्यासनाच्या माध्यमातून संरक्षण व सामरिक विषयात संशोधन व उच्च अध्ययन करता येणार आहे. या अधिकाऱ्यांना राष्ट्रीय संरक्षण आणि यासंदर्भातील संशोधन व उच्च अध्ययनासाठीही या अध्यासनाच्या माध्यमातून सुविधा पुरविण्यात येणार आहे. या अध्यासनाद्वारे एक धोरणात्मक दृष्टीकोन प्राप्त होऊन संरक्षण व सामरिक क्षेत्रातील विचारवंतांसोबत  उत्तम समन्वय साधला जाणार आहे.

००००

रितेश भुयार /वृत्त वि. क्र.46/  दिनांक 2.3.2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here