नाशिक, दिनांक: 01 मे, 2023 (जिमाका वृत्तसेवा) – महाराष्ट्र दिनानिमित्त आज जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी यांनी उपस्थितांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, उपजिल्हाधिकारी भिमराज दराडे, नितीन मुंडावरे, विठ्ठल सोनवणे, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ, जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी, जिल्हा विधी अधिकारी हेमंत नागरे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
महिला व बाल विकास विभागामार्फत रस्त्यावर राहणाऱ्या बालकांसाठी ‘फिरते पथक’ (बालकांचे आरोग्य, शिक्षण व पुनर्वसन) हा प्रकल्प सहा महिन्यासाठी नाशिक जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. या फिरत्या पथकाच्या वाहनाला जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी हिरवा झेंडा दाखवून या प्रकल्पाचा शुभारंभ केला. यावेळी समेवत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुनिल दुसाने, परिविक्षा अधिकारी प्रभाकर गावित, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी समीरा येवले, कायदा व परीक्षा अधिकारी ज्योती पठाडे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.