‘शासन आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत जिल्ह्यात ६२ शिबिरांचे आयोजन

नाशिक, दिनांक : १५ जून, २०२३ (जिमाका वृत्तसेवा) ‘लोककल्याण’ हे उद्दिष्ट समोर ठेवून शेवटच्या घटकांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी राज्य शासनामार्फत ‘शासन आपल्या दारी उपक्रम’ राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत 62 शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून, या शिबिरांच्या माध्यमांतून 2 लाख १८ हजार ४४० लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळाला आहे.

या योजनांमध्ये महसूल विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत विभाग, ‍आरोग्य विभाग, शिक्षण (प्राथमिक) विभाग, कृषी विभाग, स्वच्छ भारत मिशन, समाजकल्याण, महिला व बाल विकास, पशुसंवर्धन विभाग, मानव विकास मिशन, कामगार विभाग, कौशल्य विकास विभाग अशा शासकीय विभागांच्या विविध योजनांचा लाभ या उपक्रमाच्या माध्यमातून लाभार्थ्यांना देण्यात येत आहे.

 

‘शासन आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत झालेली तालुकानिहाय शिबिरे व लाभार्थी संख्या

 

क्र.

तालुका

शिबिरांची संख्या

लाभार्थीं संख्या

1

नाशिक

2

12281

2

निफाड

5

14240

3

सिन्नर

3

6402

4

मालेगांव

4

35396

5

कळवण

3

81038

6

सुरगाणा

5

5807

7

दिंडोरी

6

21897

8

पेठ

6

2282

9

येवला

5

11483

10

नांदगाव

3

4085

11

चांदवड

4

6444

12

देवळा

3

2785

13

बागलाण

5

7982

14

इगतपुरी

3

2391

15

त्र्यंबकेश्वर

5

3927

एकुण

62

218440

000