मुंबई, दि. 15 : राज्यात 15 जून पासून शाळा सुरू झाल्या असून यंदाच्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली आहे. या वर्षी राज्य शासन विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण प्रगतीसाठी राबवित असलेल्या विविध उपक्रमांची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिली आहेत. मंत्री श्री. केसरकर यांची ही विशेष मुलाखत ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात प्रसारित होणार आहे.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून ही मुलाखत शुक्रवार, दि. 16 जून 2023 रोजी सायं 7.30 वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येईल. ज्येष्ठ पत्रकार विवेक भावसार यांनी ही मुलाखत घेतली आहे.
महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक पुढीलप्रमाणे –
ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR
फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR
यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR