मुंबई, दि. 23: राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती दरवर्षी 26 जून रोजी साजरी करण्यात येते. हा दिवस सामाजिक न्याय दिन म्हणून ही साजरा केला जातो. या निमित्ताने मुंबई येथील कीर्ती महाविद्यालयातील प्रा. डॉ. हर्षद भोसले यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी केलेल्या सामाजिक आणि शैक्षणिक सुधारणा या विषयावर ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून माहिती दिली आहे.
राजर्षी शाहू महाराजांनी शिक्षणप्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. जातिभेद दूर करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. या विषयांवर ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून सविस्तर माहिती प्रा.डॉ. भोसले यांनी आपल्या व्याख्यानातून दिली आहे.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून हे व्याख्यान सोमवार, दि. 26 जून 2023 रोजी सायं 7.30 वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येईल.
महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक पुढीलप्रमाणे
ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR
फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR
यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR