सोमवार, मे 12, 2025
Home Blog Page 1677

आचारसंहिता कालावधीत ४३ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त – अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांची माहिती

मुंबई, दि. 4 : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता कालावधीत निवडणूक यंत्रणा, पोलीस, आयकर विभाग, उत्पादन शुल्क विभाग आदी विभागांनी केलेल्या कारवाईत आतापर्यंत रोख रक्कम, दारु, मादक पदार्थ, सोने-चांदी आदी स्वरुपात 43 कोटी 8 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी आज दिली.

        

श्री. शिंदे म्हणाले, भरारी पथके (एफएस), स्थ‍िर सर्व्हेक्षण पथके (एसएसटी), पोलीस, आयकर आणि सीमाशुल्क विभागाने केलेल्या कारवाईत आजपर्यंत 9 कोटी 53 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. भरारी पथके (एफएस), स्थ‍िर सर्व्हेक्षण पथके (एसएसटी), पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत 9 कोटी 71 लाख रुपये किमतीची 11 लाख 88 हजार 400 लिटर दारु जप्त करण्यात आली आहे.

        

निवडणूक यंत्रणा आणि अंमली पदार्थ विरोधी दलाने केलेल्या कारवाईत आतापर्यंत 15 कोटी 7 लाख रुपयांचे मादक पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. याशिवाय 8 कोटी 77 लाख रुपयांचे  सोने, चांदी, जवाहिर आदी जप्त करण्यात आले आहेत.

००००

सचिन गाढवे/वि.सं.अ./दि.4.10.2019

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी एकूण ५ हजार ५३४ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे दाखल

अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांची माहिती

मुंबई, दि. ०४ : विधानसभा निवडणुकीसाठी आज राज्यात विविध मतदारसंघांमध्ये ३ हजार ७५४ उमेदवारांनी ५ हजार १६३ नामनिर्देशनपत्रे दाखल केली. आजपर्यंत एकूण ५ हजार ५३४ उमेदवारांनी ७ हजार ५८४ नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी श्री. दिलीप शिंदे यांनी दिली. नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याची अंतिम मुदत आज संपली.

सर्वाधिक उमेदवार भोकरमध्ये तर सर्वात कमी उमेदवार माहिम आणि शिवडीमध्ये

अधिक माहिती देताना अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी श्री. शिंदे म्हणाले, आज नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत नांदेड जिल्ह्यातील भोकर मतदारसंघात सर्वाधिक १३५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यापाठोपाठ पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात ८५ उमेदवारांनी आपली नामनिर्देशनपत्रे दाखल केली. सर्वात कमी नामनिर्देशनपत्रे मुंबईतील माहिम आणि शिवडी या मतदारसंघांमध्ये दाखल करण्यात आली. या मतदारसंघांमध्ये प्रत्येकी ४ उमेदवारांनी आपली नामनिर्देशनपत्रे आजअखेर दाखल केली.   

नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याच्या संपूर्ण कालावधीत आजअखेर नंदुरबार जिल्ह्यात ४ मतदारसंघात एकूण ४४ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केली. तर धुळे जिल्ह्यात ५ मतदारसंघात ७० उमेदवार, जळगाव जिल्ह्यात ११ मतदारसंघात १७५ उमेदवार, बुलढाणा जिल्ह्यात ७ मतदारसंघात ९५ उमेदवार, अकोला जिल्ह्यात ५ मतदारसंघात १०७ उमेदवार, वाशिम जिल्ह्यात ३ मतदारसंघात ६३ उमेदवार, अमरावती जिल्ह्यात ८ मतदारसंघात १७६ उमेदवार, वर्धा जिल्ह्यात ४ मतदारसंघात ६४ उमेदवार, नागपूर जिल्ह्यात १२ मतदारसंघात २५३ उमेदवार, भंडारा जिल्ह्यात ३ मतदारसंघात ७० उमेदवार, गोंदीया जिल्ह्यात ४ मतदारसंघात ७६ उमेदवार, गडचिरोली जिल्ह्यात ३ मतदारसंघात ४७ उमेदवार, चंद्रपूर जिल्ह्यात ६ मतदारसंघात ११० उमेदवार, यवतमाळ जिल्ह्यात ७ मतदारसंघात १३६ उमेदवार, नांदेड जिल्ह्यात ९ मतदारसंघात ४०२ उमेदवार, हिंगोली जिल्ह्यात ३ मतदारसंघात ५८ उमेदवार, परभणी जिल्ह्यात ४ मतदारसंघात ८८ उमेदवार, जालना जिल्ह्यात ५ मतदारसंघात १५० उमेदवार, औरंगाबाद जिल्ह्यात ९ मतदारसंघात २४७ उमेदवार, नाशिक जिल्ह्यात १५ मतदारसंघात २४३ उमेदवार, पालघर जिल्ह्यात ६ मतदारसंघात ८० उमेदवार, ठाणे जिल्ह्यात १८ मतदारसंघात ३०० उमेदवार, मुंबई उपनगर जिल्ह्यात २६ मतदारसंघात ३३५ उमेदवार, मुंबई शहर जिल्ह्यात १० मतदारसंघात १०६ उमेदवार, रायगड जिल्ह्यात ७ मतदारसंघात १३२ उमेदवार, पुणे जिल्ह्यात २१ मतदारसंघात ४४१ उमेदवार, अहमदनगर जिल्ह्यात १२ मतदारसंघात २०३ उमेदवार, बीड जिल्ह्यात ६ मतदारसंघात २३२ उमेदवार, लातूर जिल्ह्यात ६ मतदारसंघात १३५ उमेदवार, उस्मानाबाद जिल्ह्यात ४ मतदारसंघात ९२ उमेदवार, सोलापूर जिल्ह्यात ११ मतदारसंघात २७३ उमेदवार, सातारा जिल्ह्यात ८ मतदारसंघात १२५ उमेदवार, रत्नागिरी जिल्ह्यात ५ मतदारसंघात ४५ उमेदवार, सिंधुदूर्ग जिल्ह्यात ३ मतदारसंघात ३२ उमेदवार, कोल्हापूर जिल्ह्यात १० मतदारसंघात २०४ उमेदवार, सांगली जिल्ह्यात ८ मतदारसंघात १२५ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केली आहेत.

००००

इरशाद बागवान / वि.सं.अ. / दि.04.10.2019

स्वामी रामानंद तीर्थ यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनात अभिवादन

मुंबई, दि. 3 : थोर स्वातंत्र्यसेनानी व मराठवाडा मुक्ती संग्रामाचे प्रणेते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनात त्यांच्या प्रतिमेस उपसचिव विलास आठवले यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे उपसचिव श्रीमती मेघना तळेकर, विधान परिषद  सभापतींचे  सचिव महेंद्र काज, अवर सचिव सोमनाथ सानप, अवर सचिव रवींद्र जगदाळे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेस गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उद्या ‘सोशल मीडिया व निवडणूक’ या विषयावर पोलीस अधीक्षक डॉ.बाळसिंग राजपूत यांची मुलाखत

मुंबई,दि. ३  : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित’जय महाराष्ट्र’या कार्यक्रमात’सोशल मीडिया व निवडणूक’या विषयावर पोलीस अधीक्षक तथा  विधानसभा निवडणूक २०१९ सोशल मीडिया मॉनिटरींगचे  राज्य समन्वयक  डॉ.बाळसिंग राजपूत यांची मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून शुक्रवार दि.४ ऑक्टोबर, २०१९ रोजी रात्री ९ वाजता प्रसारित होणार आहे.      

     

सोशल मीडियाचा वापर करताना घ्यावयाची खबरदारी,विधानसभा निवडणूक २०१९ सोशल मीडिया मॉनिटरींगचे कामकाज,फेक जाहिराती कशा ओळखाव्यात,क्रियाशील सायबर संस्कृती म्हणजे काय,सोशल मीडियासंदर्भातील तक्रारीसाठी कुठे संपर्क साधावा, या विषयांची  सविस्तर माहिती डॉ. राजपूत  यांनी’जय महाराष्ट्र’  या कार्यक्रमातून दिली आहे. निवेदक हेमंत बर्वे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

पनवेलमध्ये सर्वात जास्त, तर वडाळ्यात सर्वात कमी मतदारांची नोंद

मुंबई दि. 3 : विधानसभा निवडणूक 2019 मध्ये राज्यात पनवेल मतदारसंघात मतदारांची संख्या सर्वाधिक म्हणजेच 5 लाख 54 हजार 827 आहे तर वडाळा मतदारसंघात सर्वांत कमी म्हणजेच 2 लाख 3 हजार 935 मतदारांची नोंदणी करण्यात आलेली आहे.

सर्वाधिक दुसऱ्या क्रमाकांची मतदारनोंदणी चिंचवड मतदारसंघात 5 लाख 17 हजार 004 मतदार आणि तिसऱ्या क्रमाकांची मतदारनोंदणी नालासोपारा मतदारसंघात 5 लाख 12 हजार 434 अशी झाली आहे. सर्वात कमी मतदार असलेल्या दुसऱ्या क्रमांकाची मतदार नोंदणी कुडाळ मतदारसंघात 2 लाख 15 हजार 657 अशी आहे. सर्वांत कमी तिसऱ्या क्रमाकांची मतदारनोंदणी सावंतवाडी मतदारसंघात 2 लाख 24 हजार 934 अशी  झाली आहे.

2009 मध्ये महाराष्ट्रातील एकूण मतदार 7 कोटी 59 लाख 72 हजार 310 होते. तर 2014 मध्ये एकूण मतदार 8 कोटी 35 लाख 15 हजार 425 असल्याची नोंद आहे. राज्यात 31 ऑगस्ट 2019 पर्यंत एकूण 8 कोटी 94 लाख 46 हजार 211 मतदारांची नोंदणी झाली आहे.

15 हून अधिक मतदारसंघात 2014 पेक्षा 2009 मध्ये अधिक मतदार

विधानसभा निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या मतदार नोंदणीमध्ये 15 हून अधिक मतदारसंघात 2014 पेक्षा 2009 मध्ये अधिक मतदार असल्याचे दिसून आले आहे. 2019 विधानसभा मतदार नोंदणीत सर्वाधिक कमी मतदारांची नोंद वडाळ्यात असल्याचे दिसून आले आहे.

नागपूर दक्षिण पश्चिम,नागपूर मध्य,डहाणू,मुलुंड,कलिना,वांद्रे (पश्चिम),धारावी,वडाळा,माहिम,वरळी,भायखळा,मुंबादेवी,कुलाबा शिवाजीनगर,पुणे कन्टोन्मेंट आणि सोलापूर शहर (मध्य) या मतदारसंघात 2014 पेक्षा 2009 मध्ये अधिक मतदार असल्याचे दिसून आले आहेत.

नागपूर दक्षिण -पश्चिममध्ये 2009 मध्ये 3 लाख 51 हजार 021 मतदार असल्याची नोंद आहे,तर 2014 मध्ये 3 लाख 41 हजार 300 मतदार असल्याची नोंद आहे.नागपूर मध्य मतदार संघामध्ये 2009 मध्ये 3 लाख 04 हजार 487 मतदार असल्याची नोंद आहे तर 2014 मध्ये 2 लाख 92 हजार 716 मतदार असल्याची नोंद आहे. डहाणूमध्ये 2009 मध्ये 2 लाख 36 हजार 251 मतदार असल्याची नोंद आहे तर 2014 मध्ये 2 लाख 34 हजार 175 मतदार असल्याची नोंद आहे. याप्रमाणेच इतर बारा मतदारसंघातही 2014 पेक्षा 2009 मध्ये अधिक मतदार असल्याचे दिसून आले आहे.

आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांचे आवाहन

विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमवेत बैठक संपन्न

मुंबई,दि. ३ : आदर्श आचारसंहितेचे पालन आणि निवडणूक खर्च संनियंत्रण या विषयांच्या अनुषंगाने विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमवेत आज मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या वतीने बैठक संपन्न झाली.

नामनिर्देशने दाखल करण्याची अंतिम मुदत उद्यापर्यंत (दि. ४ ऑक्टोबर) आहे. सोमवारी ७ ऑक्टोबर रोजी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. त्यानंतर विविध पक्षांचे उमेदवार निश्चित होतील. निवडणुकीच्या संपूर्ण कालावधीत सर्व राजकीय पक्षांनी तसेच उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे,असे आवाहन अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी श्री. दिलीप शिंदे यांनी यावेळी केले.

मतदारयाद्या अंतिम झाल्या असून त्याची प्रत राजकीय पक्षांना उपलब्ध करुन देण्यात येईल,असेही यावेळी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले.

यावेळी निवडणूक प्रक्रियेसंदर्भात विविध विषयांच्या अनुषंगाने चर्चा झाली. राजकीय पक्षांच्या विविध शंकांचे निरसन करण्यात आले. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या वतीने राजकीय पक्षांसमवेत वेळोवेळी अशा बैठकांचे आयोजन केले जाते.

यावेळी सह मुख्य निवडणूक अधिकारी श्री. अनिल वळवी,श्री. शिरीष मोहोड,भारतीय जनता पक्षाचे उमेश गोसावी,योगेश देशपांडे,भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे अशोक सूर्यवंशी,भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे डॉ. गजानन देसाई,आशिष दुबे,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे इरफान शेख आदी उपस्थित होते.

राष्ट्रपतींच्या हस्ते शारदा दाते यांना वयोश्रेष्ठ प्रतिष्ठित माता राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली,03 : कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथील शारदा दाते यांना राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते आज‘वयोश्रेष्ठ प्रतिष्ठित माता राष्ट्रीय पुरस्कार’प्रदान करण्यात आला.

केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या वतीने 1 ऑक्टोबर या आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून विज्ञान भवनात आयोजित कार्यक्रमात‘वयोश्रेष्ठ  पुरस्कार-2019’प्रदान करण्यात आले. केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्री थावरचंद गहलोत,राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर आणि विभागाच्या सचिव निलम साहनी,अतिरिक्त सचिव उपमा श्रीवास्तव  यावेळी मंचावर उपस्थित होत्या.

उल्लेखनीय योगदानासाठी 12 श्रेणींमध्ये देशातील व्यक्ती व संस्थांना यावेळी एकूण  15 पुरस्कार प्रदान करण्यात आले. स्वत:च्या असाध्य रोगावर मात करत आपल्या गतिमंद मुलाला इंटरनॅशनल सेलिब्रेटी बनविण्याची किमया करणाऱ्या इचलकरंजी येथील शारदा दाते यांना यावेळी‘वयोश्रेष्ठ प्रतिष्ठित माता पुरस्काराने गौरविण्यात आले. 2 लाख 50 हजार रुपये आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

शारदा दाते स्वत: कर्करोगाने ग्रस्त असून लग्नानंतर तब्बल 10 वर्षांनी त्यांच्या पोटी प्रथमेश हा गतिमंद मुलगा जन्माला आला. अशा कठीण समयी डगमगून न जाता  त्यांनी परिस्थितीचा  समर्थपणे सामना केला. आपल्या गतिमंद मुलाच्या प्रगतीसाठी त्यांनी कष्ट उपसले व मुलाला घडवत मातृत्वाचा आदर्श निर्माण केला. मुलावर उपचार सुरु असतानाच त्याचे शिक्षणही पूर्ण केले आणि त्याला स्वत:च्या पायावर उभे केले. प्रथमेश सारख्या गतिमंद मुलांच्या कल्याणासाठी कार्यरत संस्थांसोबत गेल्या 10 वर्षांपासून श्रीमती दाते जुळल्या असून आपले योगदान देत आहेत.

इचलकरंजी येथील डी.के.टी.ई. संस्थेच्या टेक्स्टाइल इंजिनिअरींग कॉलेजमध्ये गेल्या 11 वर्षांपासून प्रथमेश हा ग्रंथपाल सहायक म्हणून कार्यरत आहे. त्याच्या कर्तृत्वाचा सन्मान म्हणून प्रथमेशला राष्ट्रीय दिव्यांग पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. प्रथमेशच्या आदर्शवत कार्याचे कौतुक म्हणून त्याला स्वानुभव कथनासाठी देश-विदेशातून आमंत्रणही येतात तो आता इंटरनॅशनल सेलिब्रेटी  झाला आहे.  

शारदा दाते यांनी समाजापुढे घालून दिलेल्या आदर्शामुळेच त्यांना या मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले .

00000

रितेश भुयार /वृत विशेष क्र.227 / दि.03.10.2019                             

आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी शासकीय विभागांनी सक्रिय व्हावे – अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांचे आवाहन

मुंबई,दि.3 :शासकीय विभागांनी निवडणूक प्रक्रियेदरम्यान आदर्श आचारसंहितेच्या चौकटीत निर्णय घ्यावेत;तसेच आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करुन निवडणूक प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी सहयोग द्यावा,असे आवाहन अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी आज केले.

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहितेसंदर्भात प्रशासकीय विभागांची कार्यशाळा मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या वतीने मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. यावेळी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव,वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे,सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे,सामान्य प्रशासन विभागाच्या सचिव अंशु सिन्हा,संसदीय कार्य विभागाचे सचिव राजेंद्र भागवत आदी उपस्थित होते.

आदर्श आचारसंहिता अस्तित्वात असताना काय करावे आणि काय करु नये यासंदर्भात माहिती देण्यासाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी सुरू असलेले उपक्रम,योजना सुरू ठेवता येतील;तथापि,नव्याने सुरू करता येणार नाहीत. आपत्तीच्या प्रसंगी व पुनर्वसन कार्याबाबत प्रचलित नियमानुसार मदतकार्य  करता येईल,असे श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी पुण्याचे अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली. त्यांनी सांगितले की,निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्याच्या27ऑक्टोबर या दिवसापर्यंत आदर्श आचारसंहिता लागू राहणार आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर शासकीय तसेच अधिनस्त कार्यालये,महामंडळांच्या संकेतस्थळावरील राजकीय व्यक्तींची छायाचित्रे त्यांचे संदेश तसेच प्रसिद्धीपत्रके काढून टाकण्यात आल्याबाबत खात्री करावी.

शासकीय इमारतींवर कोणत्याही प्रकारचे राजकीय प्रचारसाहित्य लावलेले नाही याची खात्री करुन घ्यावी. अद्यापही कार्यवाही झालेली नसल्यास ते काढून टाकण्यासह गुन्हा दाखल करावा. तसेच शासकीय मालमत्तेचे विद्रुपीकरण,ध्वनिक्षेपकांचा वापर,शासकीय वाहनांचा वापर,उमेदवारांच्या निवडणूक खर्चाचा हिशोब ठेवणे,सभांचे चित्रीकरण,निवडणूक आयोगाकडून विकसित केलेले‘सी-व्हिजिल’ॲपवर येणाऱ्या तक्रारींना प्रतिसाद देणे आदी बाबतच्या तरतुदींची माहिती यावेळी देण्यात आली.

बैठकीस सहमुख्य निवडणूक अधिकारी शिरीष मोहोड यांच्यासह विविध मंत्रालयीन विभागांचे सहसचिव,उपसचिव उपस्थित होते.

०००

सचिन गाढवे/वि.सं.अ./दि.3.10.2019

Government departments should be active for the implementation of the model code of conduct in the state – Additional Chief Election Officer, Dilip Shinde

Mumbai, 3.Oct.19: “Government departments should make decisions during the election process within the framework of the model code of conduct. The code of conduct should be implemented in the state in order to make the election process successful” appealed the Additional Chief Election Officer Dilip Shinde.

He was speaking in the workshop of the administrative departments organized to inform about model code of conduct at the Ministry on behalf of the Chief Election Officer in accordance with the assembly elections. In this workshop information provided on does and don’ts when the model code of conduct exists in the state during the whole election process.

Additional Chief Secretary of Revenue Department Manukumar Srivastav, Principal Secretary of Forest Department Vikas Kharge, Principal Secretary of the department of Social Justice, Dinesh Waghmare, Secretary of General Administration Department Anshu Sinha, Secretary of Parliamentary Affairs Department, Rajendra Bhagwat and others concern officers were prominently present.

Mr. Shinde further stated that activities and projects that were ongoing before the start of the election process can be continued; however, new ones cannot be started. Assistance can be taken if there are any kind of disaster and rehabilitation works as per prevailing norms.

“Model code of conduct will remain in force until 27th October, when the entire election process is completed. Admistration should be ensure that photographs of political persons and their messages on the websites of corporations , government and subordinate offices are removed after the code of conduct is implemented in the state “ said Additional Collector of Pune, Sahebrao Gaikwad. He gave the information through a presentation.

Mr. Gaikwad further told that system make sure there should not be any kind of political propaganda is placed on government buildings. If there is still no action taken in this concern then remove such material immediately and take strict action against it.

In this workshop, information provided about the disinvestment of government property, use of sound cameras, use of government vehicles, keeping track of candidates’ election expenditure, filming of meetings, responding to complaints on the C-Vigil app developed by the Election Commission.

The meeting was attended by Deputy Chief Electoral Officer, Shirish Mohod, along with several secretaries and deputy secretaries of various departments of ministry.

00000

आदर्श आचारसंहिता के क्रियान्वयन के लिए सरकारी विभाग सक्रिय हो जाए -अतिरिक्त मुख्य चुनाव अधिकारी दिलीप शिंदे

मुंबई, दि. 3 : सरकारी विभागों ने चुनाव प्रक्रिया के दौरान आदर्श आचारसंहिता के नियमों में रहकर ही निर्णय लेना चाहिए, साथ ही आचारसंहिता का सूक्ष्म तरीके से क्रियान्वयन कर चुनाव प्रक्रिया सफल करने के लिए सहयोग देने का आवाहन अतिरिक्त मुख्य चुनाव अधिकारी दिलीप शिंदे ने आज किया। मंत्रालय में विधानसभा चुनाव के मद्देनजर आदर्श आचारसंहिता के संदर्भ में प्रशासकीय विभागों की कार्यशाला मुख्य चुनाव अधिकारी कार्यालय की ओर से आयोजित की गई थी। इस दौरान राजस्व विभाग के अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तववन विभाग के प्रधान सचिव विकास खारगे, सामाजिक न्याय विभाग के प्रधान सचिव दिनेश वाघमारेसामान्य प्रशासन विभाग की सचिव अंशु सिन्हासंसदीय कार्य विभाग के सचिव राजेंद्र भागवत आदि उपस्थित थे।

कार्यशाला में आदर्श आचारसंहिता अस्तित्व में रहते हुये क्या करना चाहिए और क्या नहीं, इस संदर्भ में जानकारी देने के लिए आयोजित की गई थी। श्री. शिंदे  ने इस दौरान बताया कि चुनाव प्रक्रिया शुरू होने से पहले जो उपक्रम, योजनाएं शुरू रख सकते है, लेकिन नए से शुरू नहीं कर सकेंगे।  आपदा के समय एवं पुनर्वसन कार्य को लेकर प्रचलित नियमों के अनुसार मददकार्य किया जा सकेगा। 

इस दौरान पुणे के अपर जिलाधिकारी साहेबराव गायकवाड ने प्रस्तुतिकरण के द्वारा उपस्थितों को जानकारी दी।  चुनाव की प्रक्रिया पूरी होने की यानि की 27 अक्तूबर इस दिन तक आदर्श आचारसंहिता लागू रहेगी। आचारसंहिता लागू होने के बाद शासकीय एवं अधिनस्त कार्यालय, महामंडल की वेबसाइट की राजनीतिक व्यक्ति के फोटो, उनके संदेश और  प्रसिद्धीपत्रक हटाने को लेकर खातरजमा करें।

शासकीय इमारतों पर किसी भी प्रकार का राजकीय प्रचारसाहित्य तो लगाया नहीं है, इस बात की भी खारतजमा करें। अभी तक कार्यवाही नहीं हुई हो, तब उसे निकालने समेत मामला दर्ज करे। साथ ही सरकारी मालमत्ता का विद्रुपीकरण, ध्वनीक्षेपका का उपयोग, सरकारी वाहनों का उपयोग, उम्मीदवारों का चुनाव खर्च का हिसाब रखना, सभा का चित्रीकरण, चुनाव आयोग की ओर से विकसित किए गए सी-विजिलॲप पर प्राप्त शिकायतों को  प्रतिसाद देना आदि को लेकर प्रावधान की जानकारी भी इस दौरान दी गई।

बैठक में सहमुख्य चुनाव अधिकारी शिरीष मोहोड समेत विविध मंत्रालयीन विभागों के सहसचिव, उपसचिव उपस्थित थे।

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आज १ हजार ४२३ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे दाखल

अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी श्री. दिलीप शिंदे यांची  माहिती

मुंबई, दि. ०३ : विधानसभा निवडणुकीसाठी आज राज्यात विविध मतदारसंघांमध्ये १ हजार ४२३ उमेदवारांनी १ हजार ९६९ नामनिर्देशनपत्रे दाखल केली. आजपर्यंत एकूण १ हजार ७९२ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी श्री. दिलीप शिंदे यांनी दिली. नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याची अंतिम मुदत उद्या ४ ऑक्टोबर २०१९ पर्यंत आहे

नंदुरबार जिल्ह्यात आज ४ मतदारसंघात १५ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केली. धुळे जिल्ह्यात ५ मतदारसंघात १६ उमेदवार, जळगाव जिल्ह्यात ११ मतदारसंघात ५२ उमेदवार, बुलढाणा जिल्ह्यात ७ मतदारसंघात २६ उमेदवार, अकोला जिल्ह्यात ५ मतदारसंघात ३४ उमेदवार, वाशिम जिल्ह्यात ३ मतदारसंघात १५ उमेदवार, अमरावती जिल्ह्यात ८ मतदारसंघात ३९ उमेदवार, वर्धा जिल्ह्यात ४ मतदारसंघात २० उमेदवार, नागपूर जिल्ह्यात १२ मतदारसंघात ४० उमेदवार, भंडारा जिल्ह्यात ३ मतदारसंघात २० उमेदवार, गोंदिया जिल्ह्यात ४ मतदारसंघात २२ उमेदवार, गडचिरोली जिल्ह्यात ३ मतदारसंघात १० उमेदवार, चंद्रपूर जिल्ह्यात ४ मतदारसंघात २१ उमेदवार, यवतमाळ जिल्ह्यात ७ मतदारसंघात ३७ उमेदवार, नांदेड जिल्ह्यात ९ मतदारसंघात ९० उमेदवार, हिंगोली जिल्ह्यात ३ मतदारसंघात १७ उमेदवार, परभणी जिल्ह्यात ४ मतदारसंघात २६ उमेदवार, जालना जिल्ह्यात ४ मतदारसंघात ४६ उमेदवार, औरंगाबाद जिल्ह्यात ९ मतदारसंघात ५९ उमेदवार, नाशिक जिल्ह्यात १५ मतदारसंघात ६० उमेदवार, पालघर जिल्ह्यात ६ मतदारसंघात २६ उमेदवार, ठाणे जिल्ह्यात १८ मतदारसंघात ६४ उमेदवार, मुंबई उपनगर जिल्ह्यात २६ मतदारसंघात ९८ उमेदवार, मुंबई शहर जिल्ह्यात १० मतदारसंघात ३० उमेदवार, रायगड जिल्ह्यात ७ मतदारसंघात ४० उमेदवार, पुणे जिल्ह्यात २१ मतदारसंघात १०१ उमेदवार, अहमदनगर जिल्ह्यात १२ मतदारसंघात ५० उमेदवार, बीड जिल्ह्यात ६ मतदारसंघात ६४ उमेदवार, लातूर जिल्ह्यात ६ मतदारसंघात ३३ उमेदवार, उस्मानाबाद जिल्ह्यात ४ मतदारसंघात २२ उमेदवार, सोलापूर जिल्ह्यात ११ मतदारसंघात ८० उमेदवार, सातारा जिल्ह्यात ८ मतदारसंघात ३१ उमेदवार, रत्नागिरी जिल्ह्यात ५ मतदारसंघात १३ उमेदवार, सिंधुदूर्ग जिल्ह्यात ३ मतदारसंघात ५ उमेदवार, कोल्हापूर जिल्ह्यात १० मतदारसंघात ६५ उमेदवार, सांगली जिल्ह्यात ८ मतदारसंघात ३७ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केली.

अर्कांसास गव्हर्नर एसा हचिंसन आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट

मुंबई, दि. 2 ऑक्टोबर :अमेरिकेच्या दक्षिणेला असलेल्या अर्कांसास राज्याचे गव्हर्नर एसा हचिंसन यांनी आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेतली.

अर्कांसास हे भात शेती आणि कापूस उत्पादनात देखील अग्रेसर आहे. कापूस उत्पादन क्षेत्रात महाराष्ट्राला सहकार्य करण्यास अर्कांसास तयार असल्याचे एसा हचिंसन यांनी यावेळी सांगितले.

अर्कांसास येथे मुख्यालय असलेल्या वॉलमार्ट या बहुराष्ट्रीय कंपनीच्या भारतात 27 शाखा असून भारतातील वेलस्पन तसेच अनेक माहिती तंत्रज्ञान कंपन्या देखील अर्कांसास राज्यात कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र व अर्कांसासमध्ये सहाकार्याचे पर्व सुरु झाल्याने राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी यावेळी आनंद व्यक्त केला.

अर्कांसास गव्हर्नर यांचे सोबत आलेल्या शिष्टमंडळात वेलस्पण कंपनीचे अर्कांसास येथील मुख्य अधिकारी राजेश चोखाणी उपस्थित होते. 0 0 0 0

Arkansas and Maharashtra can collaborate in cotton growing’ : Governor Asa Hutchinson

Mumbai, २nd Octomber : The Governor of America’s southern State of Arkansas Asa Hutchinson today expressed the willingness for cooperation with Maharashtra in the area of cotton growing.

Stating that Arkansas is America’s largest producer of rice and a leader in the production of cotton, he said Arkansas can collaborate with Maharashtra in growing cotton.

The Arkansas Governor was speaking to the Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan, Mumbai on Wednesday (२ Oct).

The Arkansas Governor told Maharashtra Governor that global retail leader Walmart was headquartered in Arkansas. He informed that Walmart has २७ stores in India. He told the Governor that Indian company Welspun is based in Arkansas and so did many Information Technology companies.

Governor Koshyari expressed the hope that business collaboration between Maharashtra and Arkansas will open new vistas of development.

The high level delegation accompanying the Arkansas Governor included the Chief Operating Officer of Welspun Rajesh Chokhani.

ताज्या बातम्या

जिल्ह्यात २८ शहीद स्मारके उभारणार  – पालकमंत्री गुलाबराव पाटील

0
▪️ भारत-तिबेट सीमा पोलिस दलाच्या जवानांकडून ‘गौरव सलामी’ जळगाव, दि. ११ (जिमाका): मातृभूमीसाठी प्राणार्पण करणाऱ्या 9 वी वाहिनी, भारत-तिबेट सीमा पोलिस दलाच्या शहीद जवान सुनील...

नागपूर येथे लवकरच जागतिक दर्जाच्या वेल्डिंग इन्स्टीट्यूटची पायाभरणी –  कामगार मंत्री आकाश फुंडकर

0
नागपूर, दि. ११: बॉयलर हा औद्योगिक क्षेत्राचा आत्मा आहे. बॉयलरच्या कार्यक्षमतेवर उत्पादन खर्च अवलंबून असतो. याची कार्यक्षमता ही बॉयलरच्या निर्मितीशी निगडीत असून परिपूर्ण कौशल्य...

गोमाता संवर्धनाशिवाय नैसर्गिक शेतीला गती नाही — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
‘गोवर्धन गोशाळा कोकण’ प्रकल्पाचे उद्घाटन सिंधुदुर्गनगरी, दि. ११ : शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी देशी गायींचे संवर्धन महत्त्वाचे असून, गोमातेचे संवर्धन केल्याशिवाय नैसर्गिक शेतीला गती मिळणार...

छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा पुढील पिढ्यांना स्फूर्तिदायक  -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
विक्रमी वेळेत आकर्षक पुतळ्याची उभारणी परिसराचा विकास करुन पर्यटनाला चालना सिंधुदुर्गनगरी, दि. ११ (जिमाका): छत्रपती शिवाजी महाराज महान योद्धा होते. त्यांचे विचार सर्वांसाठी...

निवडणूक आयुक्तांचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या शिष्टमंडळाशी संवाद

0
मुंबई दि. ११:  मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू व डॉ. विवेक जोशी यांनी आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे...