जिल्ह्यात आयटी पार्क उभारण्याचा मानस, आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देऊ- पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगलीदि. 14, (जि. मा. का.) : जिल्ह्यात आयटी पार्क उभारण्याचा मानस असूनत्यासाठी आवश्यक पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन व प्रशासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईलअशी ग्वाही कामगार मंत्री तथा पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिली.

            जिल्ह्यात आय. टी. पार्क उभारणीबाबत आयोजित प्राथमिक बैठकीत ते बोलत होते. राज्यात माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवांच्या सर्वंकष व्यापक विस्तारासाठी माहिती तंत्रज्ञान उद्याने, सॉफ्टवेअर उत्पादने, डेटा सेंटर तसेच नाविण्यपूर्ण तंत्रज्ञान त्याचप्रमाणे एकात्मिक माहिती तंत्रज्ञान शहरे विकसीत करण्यावर भर देण्यात येत आहे. या संदर्भात महाराष्ट्र राज्याचे नवीन माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरण 2023 लागू करण्यात आले आहे. या अनुषंगाने ही बैठक घेण्यात आली.

            जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधीमहापालिका आयुक्त सुनील पवारजिल्हा पुरवठा अधिकारी तथा प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बारकुलमिरज उपविभागीय अधिकारी उत्तम दिघेमहापालिका उपायुक्त स्मृती पाटील यांच्यासह आय.टी. क्षेत्रातील विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.     

            महाराष्ट्र राज्याचे नवीन माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरण 2023 अंतर्गत जागतिक स्तरावरील माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा उपक्रमांकरिता धोरणात्मक निर्णयस्पर्धात्मक विकास व व्यवसायपूरक वातावरण निर्मिती करण्यात येत आहे. उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्रांकरिताही पूरक वातावरण निर्मिती करण्यात येत आहे. या क्षेत्राच्या वाढीकरिता उच्च रोजगारक्षमप्रतिभावान व गुणवत्तापूर्ण मनुष्यबळ विकसीत करण्यात येणार आहे. तसेच या धोरणांतर्गत मुद्रांक शुल्क माफीऊर्जा सुसूत्रीकरणाचे लाभविद्युत शुल्कप्रमाणपत्र सहाय्यबाजार विकास सहाय्यपेटंट संबंधित सहाय्य आदि क्षेत्र विशिष्ट प्रोत्साहने (इन्सेंटीव्ह) दिली जाणार आहेत.

            जिल्ह्याच्या विकासासाठी सांगली शहर व जिल्ह्यात आय. टी. क्षेत्रातील व्यवसायांचे स्वागत असल्याचे सांगून पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणालेआगामी 10 वर्षानंतरची गरज ओळखून आय. टी. क्षेत्रातील व्यवसायांना आवश्यक पायाभूत सुविधा प्राधान्याने उपलब्ध करून दिल्या जातील. हिंजेवाडीच्या आय. टी. हब प्रमाणे सांगली शहरातही आय. टी. पार्क उभारण्यासाठी 10 एकर शासकीय किंवा खाजगी जागा उपलब्धीसाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे. नामांकित दर्जेदार आय. टी. हब प्रमाणे यामध्ये सर्व सोयीसुविधा उपलब्ध करण्यात येतील. जागेप्रमाणेच अखंडित वीजपुरवठा आणि इंटरनेट सुविधापाणीकुशल मनुष्यबळकर्मचारी वाहतूक सुविधाउपहारगृहसुरक्षा अशा आवश्यक सर्व बाबींचा विचार करून आराखडा तयार केला जाईल. त्यामुळे आय. टी. क्षेत्रातील कंपन्यांनी सांगली जिल्ह्यात आपला उद्योग सुरू करण्यासाठी पुढे यावेअसे आवाहन त्यांनी यावेळी केले.

            पालकमंत्री डॉ. खाडे म्हणालेजिल्ह्यात उद्योग पूरक वातावरण तयार करण्यात येत असूनशासनाच्या उद्योग स्नेही धोरणामुळे तसेच, जिल्ह्यात नव्याने आय. टी. पार्क निर्माण करण्यात येत असल्याने या क्षेत्रातील कंपन्यांना संधी मिळण्याबरोबरच जिल्ह्यातील तरुणांनाही रोजगार उपलब्ध होईलअसा विश्वास डॉ. खाडे यांनी यावेळी व्यक्त केला.

            राज्य शासनाने नव्याने माहिती तंत्रज्ञान व सहाय्यभूत सेवा धोरण जाहीर केले आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यात आय. टी. पार्क साठी या क्षेत्रातील उद्योजकांच्या अपेक्षापूर्तीसाठी प्रशासन आवश्यक सर्व मदत व सहकार्य करेलअसे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी बैठकीत सांगितले.

            यावेळी सांगली व अन्य जिल्ह्यातील दहाहून अधिक उद्योजकांनी त्यांचे मत मांडत आय. टी. पार्कसाठी व उद्योग उभारणीसाठी शासन व प्रशासनाकडून असणाऱ्या अपेक्षा व्यक्त केल्या. तसेचत्यांच्या अडचणी मांडल्या.