महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली महावितरण अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न

0
30

अलिबाग,दि.29 (जिमाका) :- मागणाव तालुक्यात महावितरण विभागाच्या वीज संदर्भात असलेल्या समस्या व इतर विभागांच्या कामकाजाचा आढावा यासंदर्भात शासकीय विश्रामगृह येथे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली.  या बैठकीत त्यांनी तालुक्याचे महावितरण संदर्भातील सर्व प्रश्न लवकरात लवकर सोडविण्यात यावेत, असे निर्देश महावितरण अधिकाऱ्यांना दिले.

यावेळी तहसिलदार विकास गारुडकर, गटविकास अधिकारी संदिप जठार, महावितरण अधीक्षक अभियंता पेण श्री.मुलाणी, कार्यकारी अभियंता रोहा प्रदीप डाळू, उपकार्यकारी अभियंता माणगांव सागर बामणकर, प्रभारी कार्यकारी अभियंता गोरेगाव, चंद्रकांत केंद्रे, नगर पंचायत मुख्याधिकारी संतोष माळी उपस्थित होते.

या बैठकीत वारक नळपाणी पुरवठा योजना, व्होल्टेज प्रश्न, विघवली हायस्कूल विद्युत पोल शिफ्टिंग, ढालघर फाटा नवीन डी. पी. बसविणे, सेल्फी पॉईंट जंक्शन बॉक्स प्रश्न, काकल, गौळवाडी पथदिवे प्रश्न, माणगांव शहरात चक्रीवादळात तात्पुरती केलेली कामे सुरळीत कायमची करणे, चिंचवली, सोन्याची वाडी विद्युत प्रश्न, वाढीव वीज बिल प्रश्न, वडवली कोंड विद्युत प्रश्न ई. विभागातील अनेक विद्युत पुरवठा व अन्य समस्यांवर चर्चा करण्यात आली. तसेच येणाऱ्या काळात माणगांव शहरातील व अन्य काही ठिकाणी भूमिगत लाईन व्यवस्था करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

तसेच सध्या पावसाळी दिवस असल्याने जनतेला कोणताही त्रास होणार, नाही या दृष्टिकोनातून लवकरात लवकर समस्या सोडवून महावितरण कंपनीमार्फत योग्य सेवा पुरवण्यात यावी. लाईट बिलाचे प्रश्न हे त्या त्या विभागात सोडविण्यात यावेत, त्यासाठी जनतेला विभाग कार्यालयात यायला लावू नये याची खबरदारी घ्यावी. बंद असलेल्या लाईटचे सब स्टेशन चालू करता येईल का याबाबत चर्चा करण्यात आली.   तसेच यासाठी निधीची आवश्यकता असल्यास तो उपलब्ध करून दिला जाईल.

००००००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here