पालकमंत्र्यांच्या हस्ते छायाचित्रकार जॉन चार्ल्स यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार

औरंगाबाद,दि. 01, (विमाका) :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या संचालक माहिती कार्यालयात येथील छायाचित्रकार असलेले जॉन चार्ल्स यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी त्यांचा सत्कार केला.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सत्कारावेळी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हा परिषदेचे मुख कार्यकारी अधिकारी विकास मिना, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलींद दुसाने यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

संचालक  कार्यालयात श्री. चार्ल्स यांना विशेष समारंभातून निरोप देण्यात आला. संचालक किशोर गांगुर्डे यांनी श्री. चार्ल्स यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. जिल्हा माहिती अधिकारी डॉ.मिलिंद दुसाने, माहिती अधिकारी डॉ. मीरा ढास, सहायक संचालक गणेश फुंदे यांच्या हस्ते त्यांचा कुटुंबियांसह पुष्पगुच्छ व भेटवस्तू देत सत्कार करण्यात आला. एका छोटेखानी निरोप समारंभात उपस्थितांनी श्री.चार्ल्स यांच्या उत्कृष्ट कामाचा गौरव केला व त्यांना शुभेच्छा दिल्या. गेली 32 वर्षे श्री.चार्ल्स यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात छायाचित्रकार म्हणून सेवा केली आहे.

यावेळी उपस्थित संचालक माहिती कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय तसेच माहिती केंद्रातील अधिकारी व सहकाऱ्यांनी आपल्या भाषणांमधून श्री. चार्ल्स यांच्या कार्याबाबत आपले विचार व्यक्त केले.

यावेळी प्रभारी माहिती सहायक प्रविण भानेगावकर, कैलास म्हस्के, सतिष वाबळे तसेच सेवानिवृत्त लेखापाल विलास सरोदे, अशोक खरात यांची भाषणे झाली.

 मूळचे औरंगाबाद येथील असलेले श्री. चार्ल्स 32 वर्षांच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनातील शासकीय सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. श्री. चार्ल्स 1991 मध्ये शासकीय सेवेत अंधार कोठडी सहाय्यक म्हणून रुजू झाले. त्यानंतर त्यांनी 2004 पासून छायाचित्रकार म्हणून सेवा केली आहे..