सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांची ९, १० व ११ ऑगस्ट रोजी ‘दिलखुलास’ तर ९ ऑगस्ट रोजी ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुलाखत

0
5

मुंबई, दि. 8 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘मेरी माटी – मेरा देश’ अर्थात ‘माझी माती – माझा देश’ हे अभियान देशात राबविण्यात येत आहे. या अभियानात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून केले आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची सांगता ‘मिट्टी को नमन, वीरों का वंदन’ या घोषवाक्यासह देशभर आयोजित ‘मेरी माटी – मेरा देश’ अर्थात ‘माझी माती – माझा देश’ या अभियानाने होणार आहे. “देशासाठी बलिदान दिलेल्या शहीद वीरांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि नमन करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येणार आहे. राज्यात हे अभियान 9 ते 14 ऑगस्ट या कालावधीत राबविण्यात येणार आहे. यादरम्यान राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आपल्या राज्यात हे अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी कशा प्रकारे तयारी करण्यात आली आहे. याबाबतची सविस्तर माहिती प्रधान सचिव श्री. खारगे यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून दिली आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत बुधवार दि.9, गुरूवार दि. 10 आणि शुक्रवार दि. 11 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे.

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून ही मुलाखत बुधवार, दि. 9 ऑगस्ट, 2023 रोजी सायं 7.30 वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येईल. वरिष्ठ सहायक संचालक देवेंद्र पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.

 

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

ट्विटर https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुकhttps://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूबhttps://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

०००

जयश्री कोल्हे/ससं/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here