कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांची लोकमान्य टिळक सामान्य रुग्णालयास भेट

0
3

मुंबईदि. १७ : वैद्यकीय सुविधा सुधारणा आणि रुग्णांसाठी पायाभूत सुविधा विकास करण्यासंदर्भात मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सायन येथील लोकमान्य टिळक सामान्य रुग्णालयास भेट दिली. यावेळी खासदार राहुल शेवाळेआमदार कॅप्टन तमिल सेल्वनआमदार कालिदास कोळंबकरमहापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल आणि संबंधित अधिकारी व डॉक्टर्स उपस्थित होते.

सायन हॉस्पिटलच्या पुनर्विकासाबाबत शासन २०१६ सालापासून प्रयत्नशील आहेत्या अनुषंगाने रुग्णांसाठी जीर्ण झालेल्या मुख्य इमारतीची पुनर्बांधणी आणि सोबतच निवासी सदनिका आणि महाविद्यालय इमारतीचा सुद्धा विकास करण्यात येणार आहे. मंत्री श्री. लोढा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीदरम्यान विकास आराखड्याचे सादरीकरण देखील झाले. त्याप्रमाणे हॉस्पिटलला आवश्यक जागात्या अनुषंगाने वाढीव वैद्यकीय क्षमता या सर्वच गोष्टी पुनर्विकासातून साध्य होणार आहेत. तसेच रुग्णांच्या सेवेसाठी येथे अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान सुद्धा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

****

 

संध्या गरवारे/विसंअ/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here