मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन शिष्यवृत्ती अर्जाबाबत कार्यवाही करण्याचे आवाहन

मुंबई, दि. 25 : मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांतील अनुसूचित जाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटी प्रणालीवर शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क योजनेकरीता नवीन (Fresh) व नूतनीकरणाच्या (Renewal)  ऑनलाइन अर्जाची स्वीकृती सुरू झाली आहे.

ऑनलाइन अर्जाची स्वीकृती शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करीता ११ ऑक्टोबर २०२३ पासून सुरु झाली आहे. महाडिबीटी ऑनलाइन शिष्यवृत्ती अर्जाबाबत सर्व महाविद्यालयांनी कार्यवाहीचे आवाहन सहायक आयुक्त, समाजकल्याण, मुंबई उपनगर प्रसाद खैरनार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.

****

शैलजा पाटील/विसंअ/