भागवत विचार सर्वदूर नेणारा अमोघ वाणीचा कीर्तनकार हरपला – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 26  : ज्येष्ठ कीर्तनकार ह. भ. प. बाबा महाराज सातारकर यांच्या निधनाने वारकरी विचार आणि भागवत धर्म सर्वदूर नेणारा अमोघ वाणीचा कीर्तनकार हरपला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस आपल्या संदेशात म्हणतात, वारकरी विचार आणि भागवत धर्म सर्वदूर नेण्यात एक कीर्तनकार म्हणून त्यांनी मोठे योगदान दिले. आवाजातील प्रेमळ आणि आश्वासक भाव तसेच उत्कृष्ट वक्तृत्व यामुळे त्यांच्या कीर्तन-प्रवचनांमध्ये श्रोते मंत्रमुग्ध होऊन जात. त्यातून मोठा चाहता वर्ग त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभर निर्माण केला. राज्य सरकारने नुकताच ‘ज्ञानोबा-तुकाराम’ पुरस्कार त्यांना दिला होता. एक ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व, संत अभ्यासक आपल्यातून निघून गेले आहेत.  मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.

त्यांच्या कुटुंबियांच्या आणि लाखो भाविकांच्या दुःखात मी सहभागी आहे.

00000