सन २०२३ चा ‘ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार’ नारायण जाधव यांना जाहीर

            मुंबई, दि. १५ :  संतांना अभिप्रेत असलेले मानवतावादी कार्य करणाऱ्या मान्यवरांना देण्यात येणारा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार सन २०२३ या वर्षासाठी नारायण जाधव यांना जाहीर झाला आहे. राज्य शासनाने या पुरस्कारांची आज घोषणा केली. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी श्री. जाधव यांचे अभिनंदन केले आहे.

            राज्य शासनाने ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार देण्यासाठी निवड समिती गठीत केली होती. या निवड समितीने सन २०२३ यावर्षीचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार नारायण जाधव यांना देण्याचा निर्णय घेतला.

            पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने आज (दि. १५ जानेवारी) याबाबतचा शासन आदेश जारी केला.

000

दीपक चव्हाण/विसंअ/