‘दिलखुलास’ कार्यक्रमात भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांची मुलाखत

0
61

मुंबई : दि, ७ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीच्या पुर्वतयारी संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांची ‘कायदा व सुव्यवस्था ‘ या विषयावरील मुलाखत मंगळवार दि. 9 एप्रिल 2024 रोजी, आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे.  ही मुलाखत भंडारा जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ-दांदळे यांनी घेतली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात पूर्व विदर्भातील नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा-गोंदिया या पाच लोकसभा मतदारसंघासाठी 19 एप्रिलला मतदान होणार आहे. यामध्ये भंडारा जिल्ह्याचाही समावेश आहे. भंडारा  जिल्ह्यातील  जिल्हा पोलीस प्रशासनाची पुर्वतयारी कशा पद्धतीने सुरु आहे ‘याविषयी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. मताणी यांनी माहिती दिली आहे.

०००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here