‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे नोडल अधिकारी ऋषिकेश हुंबे यांची मुलाखत

0
5

मुंबई, दि ७ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे’ नोडल अधिकारी ऋषिकेश हुंबे यांची मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची अंमलबजावणी या विषयावरील मुलाखत प्रसारित होणार आहे. गुरुवार ८ व शुक्रवार ९ ऑगस्ट २०२४  रोजी  आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत ही मुलाखत प्रसारित होणार आहे.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना स्वरूप, उद्दिष्टे, राज्यात या योजनेची करण्यात येणारी अंमलबजावणी, योजनेसाठी आलेले अर्ज, सहभागी संस्था आणि उमेदवारांनी केलेली नोंदणी, कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून या योजनेसाठी करण्यात आलेली तयारी याबद्दल  ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने’चे नोडल अधिकारी ऋषिकेश हुंबे  यांनी माहिती दिली आहे.

ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे. ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत शुक्रवार ९ ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी ७.३० वाजता महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येणार आहे.

एक्स – https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

—-000—

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here