महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा

0
6

मुंबई, दि. १३ : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम लतिका दिवाकर गोऱ्हे यांना मुख्यमंत्री सचिवालयाकडून सा.प्र.वि. राशि-१ (राजशिष्टाचार) दिनांक २ ऑगस्ट, २०२४ च्या निर्णयानुसार कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे. त्यानुसार त्यांना वित्त विभाग, शासन निर्णयानुसार विहित केलेल्या सर्व सेवा सुविधा अनुज्ञेय राहतील, असे महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातर्फे एका ज्ञापनाद्वारे कळविण्यात आले आहे. डॉ. नीलम गोऱ्हे या सन २००२ पासून विधानपरिषदेच्या सन्माननीय सदस्या असून सध्या त्यांची सदस्यत्वाची ४ थी टर्म सुरू आहे. त्या सन २०१९ पासून विधानपरिषद सभागृहाच्या उपसभापतीपदी कार्यरत आहेत.

००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here