स्थावर मालमत्ता क्षेत्राविषयी मंत्री समूहाची तिसरी बैठक राजधानीत; मंत्री आदिती तटकरे यांची उपस्थिती

0
77

नवी दिल्ली, दि. २२ : स्थावर मालमत्ता क्षेत्राशी संबंधित मुद्यांवर, मंत्री समूहाची तिसरी बैठक नॉर्थ ब्लॉक येथे आज बोलविण्यात आली होती. गोवाचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यास महाराष्ट्र राज्याच्या वतीने महिला व बाल विकास मंत्री, आदिती तटकरे सहभागी झाल्या होत्या.

या बैठकीत बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी, सुरेश खन्ना (अर्थमंत्री, उत्तर प्रदेश), हरपाल एस चीमा (अर्थमंत्री, पंजाब), कनुभाई देसाई (अर्थमंत्री, गुजरात) आणि के एन बालगोपाल (अर्थमंत्री, केरळ) उपस्थित होते. महाराष्ट्राच्या वतीने या बैठकीत कु. तटकरे उपस्थित होत्या. या बैठकीत स्थावर मालमत्ता क्षेत्राशी संबंधित मुद्द्यांवर विशेषत: जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास (स्वयं-पुनर्विकास किंवा विकासकामार्फत) आणि झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन या विविध विषयांवर त्यांनी राज्याच्या वतीने मुद्दे मांडले असल्याचे त्यांनी बैठकीनंतर सांगितले.

या बैठकीत पर्यटन प्रकल्पासाठी जमिनीच्या दीर्घ मुदतीच्या भाडेपट्ट्यावरील कर आकारणीच्या मुद्द्यांवरही चर्चा करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. मंत्र्यांच्या समूहाने (GoM) कु. तटकरे यांनी मांडलेल्या मुद्यांची दखल घेतली गेली असल्याचे तसेच यावर सकारात्मक विचार करण्याचा तसेच पुढील बैठकीत अधिक तपशिलांसह त्यावर अधिक चर्चा करण्याचे ठरविल्याचे त्यांनी सांगितले.

०००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here