मुंबई, दि. ९ : विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनात विधान परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा तसेच नवनिर्वाचित सदस्यांचा सभागृहाला परिचय करून दिला.
परिचय करून देण्यात असलेल्या नवनिर्वाचीत सदस्यांमध्ये पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, अमित गोरखे, परिणय फुके, सदाभाऊ खोत, भावना गवळी, कृपाल तुमाने, शिवाजी गर्जे, मिलिंद नार्वेकर, प्रज्ञा सातव, हेमंत पाटील, पंकज भुजबळ, इद्रिस नाईकवाडी, विक्रांत पाटील, धर्मगुरू बाबुसिंग महाराज राठोड, मनीषा कायंदे, चित्रा वाघ यांचा समावेश होता.
०००