मुंबई, दि. 30 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘प्रधानमंत्री मातृ वंदना योजना‘ या विषयावर आरोग्य विभागाच्या संचालक डॅा. अर्चना पाटील यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून मंगळवार दि.31 डिसेंबर 2019 रोजी संध्याकाळी 7.30 वाजता प्रक्षेपित होणार आहे. निवेदिका रेश्मा बोडके यांनी ही मुलाखत घेतली आहे.
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, या योजनेची सुरूवात, लाभार्थी निवडीची प्रक्रिया, जननी सुरक्षा योजना, माता आरोग्याकरिता राबविण्यात येणाऱ्या योजना, प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेच्या माहितीसाठी विभागाने राबविलेले उपक्रम या विषयाची माहिती डॉ.अर्चना पाटील यांनी ‘जय महाराष्ट्र‘ कार्यक्रमात दिली आहे.