राज्यमंत्री डॉ. विश्वजीत पतंगराव कदम यांचा परिचय

0
11

Ø नाव                 : डॉ. विश्वजीत पतंगराव कदम

Ø जन्म                 : 13 जानेवारी, 1981

Ø शिक्षण             : बी. ई., एम. बी. ए., पीएच. डी.

Ø ज्ञात भाषा         : मराठी, हिंदी व इंग्रजी.

Ø वैवाहिक माहिती : विवाहित, पत्नी श्रीमती स्वप्नाली.

Ø व्यवसाय          : सामाजिक कार्य, शिक्षण क्षेत्र

Ø पक्ष                  : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (आय).

Ø मतदारसंघ        : पलुस कडेगांव

Ø इतर माहिती      : कार्यवाह, भारती विद्यापीठ, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष म्हणून ऑगस्ट 2019 पासून कार्यरत, रयत शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळाचे सदस्य म्हणून नेमणूक तसेच या संस्थेच्या कार्यकारी मंडळावरही (एक्झिक्युटीव्ह कौन्सिल) निवड; प्रकुलगुरु, भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय, प्रदीर्घ काळपासून सोनहिरा सहकारी साखर कारखाना; आणि सागरेश्वर सहकारी सूतगिरणी; कडेगांव, जि. सांगली  या दोन सहकारी उद्योगांच्या संचालकपदी काम करीत आहेत, वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष, पुणे; जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे निर्वाचित अध्यक्ष ,फुटबॉल खेळाच्या विविध स्पर्धांचे आयोजन करणाऱ्या डेक्कन इलेव्हन क्लब या क्षेत्रातील प्रतिष्ठित फुटबॉल संघटनेशी ते निगडित आहेत;

युवक काँग्रेसच्या निवडणुकीत प्रथम सप्टेंबर2011 मध्ये व पुन्हा दुसऱ्यांदा जानेवारी 2014 मध्ये महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवडणूकीच्या माध्यमातून त्यांची बहुमताने निवड झाली होती. डॉ . विश्वजीत कदम यांनी 27 शाखा असलेल्या भारती सहकारी बैंक लि. पुणे या मल्टीस्टेट शेड्यूल बँकेचे अनेक वर्षे काम पाहिलेले आहे; अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, (ए. आय. सी. टी. ई). नवी दिल्ली या भारत सरकारच्या मानव संसाधन मंत्रालयाने निर्माण केलेल्या संस्थेवर सदस्य म्हणून काम केले आहे; भारत सरकारच्या अन्न प्रक्रिया उद्योग व्यवसाय विभागाच्या भारतीय द्राक्ष प्रक्रिया मंडळाचे अध्यापन, संशोधन, हॉस्पिटॅलिटी व्यवसाय इत्यादीचे प्रतिनिधी सदस्य म्हणून नामांकन झाले होते; भारत सरकारच्या मानव व संसाधन विभागातंर्गत उप शिक्षण विभागाअंतर्गत नियोजन आयोगाच्या तंत्रविज्ञान विषयक अभ्यासगटाचे सदस्य; शैक्षणिक, सांस्कृतिक आणि समाजोपयोगी कार्य करणाऱ्या अभिजित कदम मेमोरियल फौंडेशनचे व्यवस्थापकीय विश्वस्त आहेत. 2018 मधील पोटनिवडणुकीत सदस्य, महाराष्ट्र विधानसभा; ऑक्टोबर, 2019 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर निवड.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here