मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब घेतले आई एकवीरेचे दर्शन

पुणे दि.12 : मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब आपले कुलदैवत असलेल्या वेहेरगाव कार्ला येथील आई एकवीरेचे दर्शन घेतले. त्यांच्या समवेत पत्नी सौ. रश्मी ठाकरे, पुत्र आ. आदित्य ठाकरे होते.मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री श्री.ठाकरे हे आपले कुलदैवत असलेल्या देवीच्या दर्शनासाठी आले.

यावेळी मावळचे खासदार श्रीरंग बारणेमावळचे आमदार सुनील शेळके, माजी महापौर अनंत तरे, मदन भोई, नवनाथ देशमुख, विलासराव कुटे, कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके, अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, प्रांताधिकारी संदेश शिर्के, तहसिलदार मधुसूदन बर्गे व इतर उपस्थित होते. दर्शनानंतर मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांचा देवस्थानच्या वतीने सत्कार करण्यात आला. ००००

CM Uddhav Thackeray with the family

paid a visit to Goddess Ekvira Temple

Pune, date.12th: CM Uddhav Thackeray with his family visited the family deity temple of Goddess Ekvira at Vehergaon Karla. His wife Mrs. Rashmi Thackeray and son MLA Aditya Thackeray accompanied him. CM Shri. Thackeray visited the family deity temple the first time after becoming CM.

Maval’s MLA Sunil Shelke, former Mayor Anant Tare, Madan Bhoi, Navnath Deshmukh, Vilasrao Kute, Special Police Inspector General of Kolhapur Suhas Varke, Upper District Collector Sahebrao Gaikwad, Provincial Officer Sandesh Shirke, Tehsildar Madhusudan Barge, and others were present at that time.  CM Shri. Thackeray was honored with reverence by the temple trust.

0000

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने

परिवार सहित किया आई एकवीरा के दर्शन

पुणे,दि. 12 : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने परिवार सहित वेहेरगाव कार्ला में अपनी कुलदेवी आई एकवीरा के दर्शन किया। उनके साथ उनकी पत्नी सौ. रश्मी ठाकरे,पुत्र आ. आदित्य ठाकरे थे। मुख्यमंत्री के रूप में शपथ लेने के बाद पहली बार,श्री ठाकरे अपनी कुलदेवी के दर्शन करने आए।

इस मौके पर मावल के खासदार श्रीरंग बारणे, विधायक सुनील शेलके,पूर्व मेयर अनंत तरे,मदन भोई,नवनाथ देशमुख,विलासराव कुटे,कोल्हापुर क्षेत्र के विशेष पुलिस महानिरीक्षक सुहास वारके,अतिरिक्त जिलाधिकारी साहेबराव गायकवाड,प्रांतीय अधिकारी संध्या शिर्के,तहसीलदार मधुसूदन बर्गे व अन्य उपस्थित थे। दर्शन के बाद मुख्यमंत्री श्री. ठाकरे का धर्मस्थल की ओर से सत्कार किया गया।

००००