नवनिर्वाचित अध्यक्षांचे मुख्यमंत्र्यांनी केले स्वागत
मुंबई, दि. 1 : संसदीय लोकशाहीत विधानसभेची गौरवास्पद परंपरा आहे. या परंपरेचा गौरव राखण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन, असे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आज विधानसभेत सांगितले.
अध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर सभागृहाने केलेल्या अभिनंदनाला उत्तर देताना श्री. पटोले बोलत होते. 14 व्या विधानसभेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
श्री.पटोले म्हणाले, येथे Discuss, Debate, Dialogue & Do Not Disturb या चार D वर आधारित कामकाज करत असताना सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे. राज्यातील वंचित घटकांना न्याय देण्याची माझी भूमिका राहील, शेतकरी तसेच राज्यातील प्रत्येक घटकाला सभागृहाच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न राहील.
कोणावरही अन्याय होऊ देऊ नये- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
राज्याची विधानसभा ही लोकशाहीतील सर्वोच्च स्थानी आहे. विधानसभा अध्यक्ष म्हणून काम करताना कोणावरही अन्याय होणार नाही, अशी भूमिका अध्यक्षांनी घ्यावी अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्यक्त केली. श्री. नाना पटोले यांची विधानसभा अध्यक्ष म्हणून नेमणूक झाल्यानंतर त्यांचे अभिनंदन करताना ते बोलत होते.
मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, भंडारा जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबातून आलेल्या श्री.पटोले यांचा स्वभाव हा बंडखोर आणि अन्याय सहन न करणारा आहे. आपलं मत मांडत असताना कोणाचीही पर्वा न करता धाडस दाखवणारा नेता आहे. त्यांनी समाजातील विविध घटकांच्या हक्कासाठी वेळोवेळी आवाज उठवला आहे. विधानसभा अध्यक्ष म्हणून सत्ताधारी आणि विरोधी पक्ष दोघांनाही सांभाळून घेत योग्यवेळी समज देवून कामकाज चालविण्याची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे.
विरोधी पक्षाकडूनही सहकार्याची अपेक्षा- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लोकहितांच्या बाबींवर विरोधी पक्ष म्हणून प्रश्न मांडले जात असताना अध्यक्षांकडून सहकार्याची अपेक्षा असेल. श्री.पटोले यांनी दोन्ही बाजूला काम केलेले असल्याने दोन्ही बाजूच्या आशा आणि अपेक्षा त्यांना माहिती आहे. त्यांच्या अनुभवाचा सभागृहाला फायदा होईल. आतापर्यंत या पदावर काम केलेल्या सर्व अध्यक्षांनी उत्तम कामगिरी बजावली आहे. या पदाची गरिमा ते राखतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
विधानसभा अध्यक्षांच्या निवडीनंतर मंत्री एकनाथ शिंदे, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, सदस्य सर्वश्री अजित पवार, अशोक चव्हाण, माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे, छगन भुजबळ, हितेंद्र ठाकूर, अबु आझमी, बच्चू कडू, श्रीमती मनीषा चौधरी, जितेंद्र आव्हाड, संजय कुटे, आशिष जयस्वाल आणि ॲड. श्रीमती यशोमती ठाकूर यांनी अभिनंदनपर भाषण केले.
0000
नवनिर्वाचित अध्यक्ष का मुख्यमंत्री ने किया स्वागत
विधानसभा का गौरव बनाए रखने के लिए प्रयास करूंगा– विधानसभा अध्यक्ष नाना पटोले
मुंबई दि. 1 : संसदीय लोकशाही में विधानसभा की गौरवास्पद परंपरा रही है। इस परंपरा को बनाए रखने में मैं पूरी तरह से प्रयास करूंगा, यह विधानसभा अध्यक्ष नाना पटोले ने आज विधानसभा में कहा। अध्यक्ष के रूप में चयन होने के बाद सभागृह में हुए अभिनंदन पर अपनी भावना व्यक्त करते हुए वे बोल रहे थे। 14 वें विधानसभा के अध्यक्ष पद पर उनका निर्विरोध चयन होने पर उन्होंने कृतज्ञता व्यक्त की।
श्री. पटोले ने कहा कि यहाँ पर Discuss, Debate, Dialogue & Do Not Disturb इन चार D पर आधारित कामकाज करते हुए आप सभी का सहयोग आवश्यक है। राज्य के वंचित वर्गों को न्याय देने में मेरी भूमिका रहेगी। किसान एवं राज्य के प्रत्येक वर्ग को सभागृह के माध्यम से न्याय देने के लिए मैं हमेशा प्रयासरत रहूँगा।
किसी पर भी अन्याय न हो– मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
राज्य की विधानसभा यह लोकशाही में उच्चतम स्थान पर है। विधानसभा अध्यक्ष के रुप में काम करते समय किसी पर भी अन्याय न हो, इस तरह की भूमिका अध्यक्ष की होगी, यह आशा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने आज यहाँ पर व्यक्त की। श्री. नाना पटोले की विधानसभा अध्यक्ष के रूप में नियुक्ति होने पर मुख्यमंत्री ने उनका अभिनंदन किया।
मुख्यमंत्री श्री.ठाकरे ने कहा कि भंडारा जिले में एक किसान परिवार से आए श्री.पटोले का स्वभाव बंडखोर और अन्याय पर आवाज उठानेवाला है। अपना विचार रखते हुए किसी की भी पर्वा न करते हुए बहुत साहस एवं धैर्य से आगे बढ़नेवाले नेता में वे है। उन्होंने समाज के विविध वर्गों के अधिकार एवं उनके हक के लिए समय-समय पर आवाज उठाया है। विधानसभा अध्यक्ष के रुप में सत्ताधारी और विरोधी पक्ष दोनों को भी संभालते हुए उचित समय पर मार्गदर्शन करते हुए कामकाज चलाने का ज़िम्मेदारी उन पर होगी।
अध्यक्ष से सहयोग की अपेक्षा– विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस
विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस ने कहा कि जनहित को लेकर अपनी बात रखते हुए अध्यक्ष की ओर सहयोग की अपेक्षा करूंगा । श्री. पटोले ने दोनों तरफ काम किया है, इसलिए दोनों तरफ की आशा और अपेक्षा उन्हें पता है और उनके अनुभव का सभागृह को फायदा होगा। अब तक इस पद पर काम किए हुए सभी अध्यक्षों ने उत्तम कार्य किया है। वे इस पद गरिमा को बनाए रखेंगे, यह विश्वास उन्होंने इस दौरान व्यक्त किया।
विधानसभा अध्यक्ष के चयन के बाद मंत्री एकनाथ शिंदे, जयंत पाटिल, बालासाहेब थोरात, सदस्य सर्वश्री अजित पवार, अशोक चव्हाण, पूर्व अध्यक्ष हरिभाऊ बागडे, छगन भुजबल, हितेंद्र ठाकूर, अबु आझमी, बच्चू कडू, श्रीमती मनिषा चौधरी, जितेंद्र आव्हाड, संजय कुटे, आशिष जयस्वाल और ॲड श्रीमती यशोमती ठाकूर ने अभिनंदन पर भाषण किया।
0000