‘दिलखुलास’ कार्यक्रमात उद्या संविधान दिन कार्यक्रमाचा वृत्तान्त

मुंबई,दि. 27 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित‘दिलखुलास’कार्यक्रमात‘नागरिकांचे मूलभूत कर्तव्य जागरुकता मोहीम’शुभारंभ कार्यक्रमाचा वृत्तान्त प्रसारित होणार आहे. हा वृत्तान्त राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून गुरुवार दि. 28 आणि शुक्रवार दि. 29 नोव्हेंबर रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. निवेदिका रेश्मा बोडके यांनी या वृत्तान्ताचे वाचन केले आहे.

राज्यात 26 नोव्हेंबर 2019 ते 26 नोव्हेंबर 2020 या वर्षाच्या कालावधीत‘नागरिकांचे मूलभूत कर्तव्य जागरुकता मोहीम’राबविण्यात येणार असून पुढील वर्षभर विविध विभागांमार्फत विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.  राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथिगृह येथे या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मुख्य सचिव अजोय मेहता,सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे,विधिज्ञ डी.एन. संदानशीव,बार्टीचे महासंचालक कैलास कणसे,समाजकल्याण आयुक्त मिलिंद शंभरकर आदी उपस्थित होते. या जागरुकता मोहीम शुभारंभ कार्यक्रमाचा वृत्तान्त’दिलखुलास’या कार्यक्रमातून प्रसारित होणार आहे.