विधानसभा हंगामी अध्यक्षपदी ज्येष्ठ सदस्य कालिदास कोळंबकर

मुंबई दि. 26 : महाराष्ट्र विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदाची ज्येष्ठ सदस्य कालिदास नीळकंठ कोळंबकर यांनी शपथ घेतली. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी त्यांना शपथ दिली.

राजभवनात पार पडलेल्या या शपथविधी समारंभाला मुख्य सचिव अजोय मेहता,विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव आर. एन लढ्ढा,विधानमंडळ सचिव (कार्यभार) राजेंद्र भागवत आदी उपस्थित होते. यावेळी राज्यपाल यांनी श्री.कोळंबकर यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.