परिचय केंद्राकडून दिवाळी अंकांची समृद्ध परंपरा जपण्याचे उत्तम कार्य – उपायुक्त संदीप माळवी

0
8

महाराष्ट्रपरिचयकेंद्रातदिवाळीअंकप्रदर्शनाचेउद्घाटन

नवी दिल्ली,22 :महाराष्ट्रातील दिवाळी अंकांची समृद्ध परंपरा  राजधानी दिल्लीत जपण्याचे मोलाचे कार्य महाराष्ट्र परिचय केंद्र करीत असल्याचे गौरवोद्गार ठाणे महानगरपालिकेचे उप आयुक्त संदीप माळवी यांनी आज येथे काढले.

श्री.माळवी यांच्या हस्ते आणि अनिवासी भारतीय ॲड.प्रणिता देशपांडे यांच्या उपस्थितीत आज महाराष्ट्र परिचय केंद्राच्या दिवाळी अंक प्रदर्शनाचे उद्घाटन झाले.यावेळी श्री.माळवी यांनी हे विचार मांडले. 

परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी  श्री. माळवी आणि श्रीमती देशपांडे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.  महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

शिक्षण,आरोग्य,राजकारण,महिला,बालक,तरूण,चित्रपट अशा विविध विषयांना वाहिलेले सकस दिवाळी अंक मराठी भाषेत प्रक्राशित होतात.ही दिवाळी अंकांची मेजवानी परिचय केंद्र मराठी वाचकांना राजधानी दिल्लीत उपलब्ध करून देते. दिवाळी अंकांची समृद्ध संस्कृती या निमित्ताने जपली जाते ही गौरवाची बाब असल्याचे श्री.माळवी यांनी सांगितले.

ॲड.देशपांडे म्हणाल्या,मराठी भाषेतील वैविध्यपूर्ण साहित्य दिवाळी अंकांच्या रूपात वाचकांना एकत्रित वाचायला मिळते.हा साहित्यिक ठेवा वाचकांपर्यंत पोहोचविण्याची परिचय केंद्राची दीर्घ परंपरा कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.परिचय केंद्रात असलेल्या हस्तलिखित दिवाळी अंकांचे डिजिटायजेशन केल्यास आम्हा परदेशातील मराठीजनांनाही हे दुर्मिळ अंक वाचायला मिळतील, अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.

प्रदर्शनात125दिवाळी अंकांची मेजवानी  

या प्रदर्शनात गृहलक्ष्मी,आवाज,  मिळून साऱ्याजणी,चारचौघी,श्री व सौ,अंतर्नाद,जत्रा,किशोर,अक्षरधारा,तारांगण,कालनिर्णय,उत्तम कथा,निरंजन,अन्नपूर्णा,लोकसत्ता,महाराष्ट्र टाइम्स,लोकमत-दिपोत्सव,साप्ताहिक सकाळ,  प्रभात,झी मराठी आदी125  दिवाळी अंक मांडण्यात आले आहेत.हे प्रदर्शन दिनांक28नोव्हेंबर2019पर्यंत सकाळी9ते सायंकाळी  6वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे.

 000000 

रितेशभुयार/वृत्तवि.क्र.२५५/  दिनांक22/11/2019    

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here