भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यातील महाराष्ट्र दालनाचे उद्घाटन

0
6

नवी दिल्ली, दि. 14 : भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात‘महाराष्ट्रातील व्यवसाय सुलभतासंकल्पनेवर आधारीत महाराष्ट्र दालनाचे उद्घाटन आज महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त समीर सहाय यांच्या हस्ते झाले.

केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायजेशनच्यावतीने येथील प्रगती मैदानमध्ये ३९ व्या‘भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्याचेआयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाने येथील हॉल क्रमांक १२-अमध्ये व्यवसाय सुलभतेच्यामाध्यमातून महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्राच्या प्रगतीचे दर्शन घडविणारे सुरेख प्रदर्शन साकारले आहे. महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त समीर सहाय यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. यावेळी महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक बी.वेणुगोपाल रेड्डी, महाराष्ट्र सदनाच्या सहायक निवासी आयुक्त सुमन चंद्रा आणि महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक विजय कपाटे उपस्थित होते.

महाराष्ट्र दालनामध्ये एकूण १० स्टॉल्स उभारण्यात आले असून‘महाराष्ट्र उद्योग, व्यापार आणि गूंतवणूक सुविधा कक्ष’, महाराष्ट्र उद्योग विकास महामंडळ, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि बृहन्मुंबई महानगर पालिका यांच्यावतीने राज्यात व्यवसाय सुलभतेच्यामाध्यमातून उद्योग क्षेत्रात झालेली प्रगती दर्शविणारे स्टॉल्स उभारण्यात आले आहेत.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोन्नती अभियान, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ, महिला आर्थिक विकास महामंडळ आणि आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था यांनी हस्तकला कारागिरांनी तयार केलेल्या वस्तू तसेच बचतगटांनी तयार केलेल्या वस्तुंचे प्रदर्शन व विक्रीसाठी स्टॉल्स उभारले आहेत.

२० नोव्हेंबर रोजी साजरा होणारमहाराष्ट्र दिन 

व्यापार उद्येागासह या मेळाव्यात सहभागी विविध देश आणि राज्यांच्यावतीने आपली सांस्कृतिक परंपरा दर्शविणारा सांस्कृतिक कार्यक्रम दररोज सादर केला जातो. याअंतर्गत २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता प्रगती मैदान येथील‘हंसध्वनी रंगमंचयेथे महाराष्ट्र दिनसाजरा होणार आहे. मुंबई येथील पृथ्वी इनोव्हेशन्स ग्रुपचे कलाकार हा कार्यक्रम सादर करणार असून या माध्यमातून व्यापार मेळ्यास भेट देणाऱ्या देश-विदेशातील उद्योजक व ग्राहकांना महाराष्ट्राच्या वैविद्यपूर्ण संस्कृतिचे दर्शन होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here