मुंबई, दि. 7 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 19 जानेवारी 2020 रोजी घेण्यात येणार आहे.
इ.1 ली ते इ. 5 वी व इ. 6 ते इ. 8 वी साठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम, अनुदानित/विना अनुदानित, कायम विना अनुदानित, इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक/शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमत: ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. या परीक्षेशी संबंधित सर्व शासन निर्णय, अनुषंगिक माहिती, सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या htpps://mahatet.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ऑनलाईन अर्ज भरणे, परीक्षा शुल्क भरणे, परीक्षेची वेळ व इतर सविस्तर माहितीचा तपशील परिषदेच्या वेबसाईटवर देण्यात आला आहे.
परीक्षेची ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया दि.08/11/2019 पासून सुरु होत असून दि. 28/11/2019 अखेरपर्यंत उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरता येतील.
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा-2019 वेळापत्रक
अ.क्र. | कार्यवाहीचा टप्पा | दिनांक व कालावधी |
1 | ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी | 08/11/2019 ते 28/11/2019 |
2 | प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे | 04/01/2020 ते 19/01/2020 |
3 | शिक्षक पात्रता परीक्षा पेपर-Iदिनांक व वेळ | 19/01/2020 वेळ स.10.30 ते दु.13.00 |
4 | शिक्षक पात्रता परीक्षा-IIदिनांक व वेळ | 19/01/2020 वेळ दु.14.00 ते सायं.16.30 |
000