जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याबाबत अडचण असल्यास तत्काळ संपर्क करण्याचे आवाहन अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे आवाहन
मुंबई, दि.30 : कोरोना आजारासंदर्भात सरकारने जाहीर केलेल्या देशव्यापी लॉकडाऊन दरम्यान नागरिकांना रेशन दुकानावर साहित्य न मिळणे, बाजारात वाढीव दराने वस्तूंची विक्री होणे तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याबाबत राज्यभरातून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे मंत्री श्री. छगन भुजबळ यांच्या कार्यालयामार्फत तात्काळ निरसन केले जात आहे.
जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याबाबत तसेच इतर कोणत्याही स्वरुपाच्या समस्या भेडसावत असल्यास नागरिकांना सहाय्य मिळवून देण्यासाठी मंत्री महोदय यांचे कार्यालय सदैव तत्पर असून तक्रारदारांनी खालील क्रमांकावर संपर्क साधण्याचे मंत्री कार्यालयाचे आवाहन आहे.
श्री.संतोषसिंग परदेशी-खाजगी सचिव – 9870336560
श्री.अनिल सोनवणे-विशेष कार्य अधिकारी – 9766158111
श्री.महेंद्र पवार- विशेष कार्य अधिकारी- 7588052003
श्री.महेश पैठणकर-स्वीय सहाय्यक-7875280965
मंत्री कार्यालयामार्फत अशी सुविधा प्रथमच सुरू झाली आहे. नागरिकांचा याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. नागरिक या सुविधेबाबत समाधानी आहेत.