राज्यपालांची बाणगंगा तलावाला भेट; जीर्णोद्धार कार्याची घेतली माहिती

मुंबई, दि. 2 : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज वाळकेश्वर येथील ऐतिहासिक बाणगंगा तलाव परिसराला भेट दिली तसेच तेथील जीर्णोद्धार व वारसा जतन कार्याची माहिती घेतली.

त्यानंतर राज्यपालांनी जवळच असलेल्या कवळे मठाच्या शांतादुर्गा मंदिरालादेखील भेट दिली. जीएसबी मंदिर विश्वस्तांच्या वतीने यावेळी राज्यपालांचा सत्कार करण्यात आला.

मलबार हिलचे आमदार मंगलप्रभात लोढा, नगरसेविका ज्योत्स्ना मेहता, महापालिकेचे उपायुक्त प्रवीण गायकवाड, बाणगंगा जतन कार्यात सहकार्य करणाऱ्या आरपीजी फाउंडेशनचे अधिकारी, बाणगंगा तलाव जीएसबी टेम्पल ट्रस्टचे विश्वस्त प्रवीण कानविंदे तसेच कवळे मठाचे विश्वस्त भूषण ज्याक आदी उपस्थित होते. 

००००

Governor visits historic Banganga Tank;

takes stock of restoration work

Mumbai Dated 2 : Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari today visited the historic Banganga Tank at Walkeshwar and obtained information about the heritage conservation work being carried out.

The Governor also visited the Kavale Math Shanta Durga Temple for a darshan. He was felicitated by the GSB Temple trustees on the occasion.

Malabar Hill MLA Mangal Prabhat Lodha, Corporator Jyotsna Mehta, Deputy Municipal Commissioner of BMC Pravin Gaikwad, officials of RPG Foundation, Trustee of GSB Temple Trust Pravin Kanvinde and Secretary Bhushan Jack were present.