आचारसंहिता काळात आतापर्यंत राज्यात ३ कोटीहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त

0
10

मुंबई, दि. 24 : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून मागील तीन दिवसात आयकर विभाग,उत्पादन शुल्क विभाग,पोलीस यांनी केलेल्या कारवाईत एकूण 3 कोटी 79 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये एक कोटी 36 लाखांची रोख रक्कम,1 कोटी 68 लाख किंमतीचे मद्य,29 लाख रुपये किंमतीचे मादक पदार्थ व 46 लाख रुपये किंमतीचे मौल्यवान दागिने यांचा समावेश असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

आदर्श आचारसंहिता कालावधीत आतापर्यंत शासकीय जागेवरील 75 हजार 981,सार्वजनिक ठिकाणच्या 73 हजार 445 व खासगी ठिकाणावरील 16 हजार 428 जागांवरील अनधिकृत फलक,बॅनर,कटआऊट व झेंडे काढण्यात आले आहेत. सर्व जाहिराती,पोस्टर व कटआऊट हटविण्याच्या सूचना सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. मुदतीत हे सर्व साहित्य काढण्यात येत आहेत. आचारसंहिता भंग प्रकरणी आतापर्यंत 50 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. कायद्यानुसार बंदी असलेल्या प्लॅस्टिकचा वापर करू नये व पर्यावरणाला हानी पोहोचेल अशा वस्तू टाळाव्यात,असेही आवाहन श्री.शिंदे यांनी केले.

००००

नंदकुमार वाघमारे/विसंअ/24.9.19

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here