मतदारांच्या सुविधेसाठी ५ हजार ४०० मतदान केंद्र तळमजल्यावर स्थलांतरित

0
15

मुंबई, दि. 24 : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची तयारी सुरु असून लोकसभा निवडणुकीच्या वेळी पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर असलेली सुमारे पाच हजार चारशे मतदान केंद्र तळमजल्यावर आणण्यात आली आहेत. यामुळे दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक यांना मतदानासाठी सहभाग घेणे सुलभ होईल.

मुंबई, मुंबई उपनगरे, ठाणे, नाशिक, पुणे यासारख्या महानगरांमध्ये जागेच्या मर्यादेमुळे लोकसभा निवडणुकीसाठी काही ठिकाणी पहिल्या किंवा दुसऱ्या मजल्यावर मतदान केंद्र ठेवण्यात आली होती. विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांना सोयीचे व्हावे, म्हणून पहिल्या अथवा दुसऱ्या मजल्यावरील सुमारे 5400 मतदान केंद्रे तळमजल्यावर स्थलांतरित करण्यात आली असून जेथे लिफ्टची सुविधा आहे अशाच ठिकाणची मतदान केंद्र पहिल्या अथवा दुसऱ्या मजल्यावर ठेवण्यात आली आहेत, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली आहे.

2014 च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान राज्यात 91 हजार 329 मतदान केंद्रे होती. त्यात 5 हजार 325 मतदान केंद्रांची वाढ झाली आहे. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत 96 हजार 454 मतदान केंद्र आहेत. तेथे रॅम्प, व्हिल चेअर, पिण्याचे पाणी या आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात येतील.

भारत निवडणक आयोगाने या वर्षी दिव्यांग मतदारांचा सहभाग वाढावा यासाठी‘सुलभ निवडणुकाहे घोषवाक्य जाहीर केले आहे. यावर्षीच्या मतदार यादीमध्ये आतापर्यंत 3 लाख 60 हजार 885 दिव्यांग मतदार समाविष्ट आहेत. त्यांच्या सुलभतेसाठी मतदान केंद्रांवर रॅम्प, व्हिलचेअर यांची सुविधा करण्यात येईल.

००००

अजय जाधव/विसंअ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here