अवकाळी पावसाचा इशारा; शेतमालाची काळजी घेण्याचे आवाहन

0
33

अकोला दि.१४(जिमाका) – प्रादेशिक हवामान विभाग नागपुर यांच्याकडून प्राप्त संदेशानुसार जिल्ह्यात मंगळवार दि.१४ ते शनिवार दि. १८ मार्च दरम्यान विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

या कालावधीत विजांचा कडकडाट,अतिवृष्टी तसेच दि.१६ ते १८ दरम्यान ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. या कालावधीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाचे नुकसान टाळण्यासाठी खबरदारी घ्यावी. शेतमाल सुरक्षीत ठिकाणी साठवावा.  बाजार समितीतही विक्रीसाठी आणलेला माल सुरक्षीत ठेवावा. मालाचे नुकसान होणार नाही;याची काळजी घ्यावी. विजा व गारांपासून बचाव करावा. सुरक्षीत ठिकाणी आश्रय घ्यावा, अशा सुचना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाने निर्गमित केल्या आहेत. यासुचनांचे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here