कोरोनासंदर्भात नागरिकांनी घाबरुन जाऊ नये- पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा, दि. 6 : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या पाहता नागरिकांनी घाबरुन जाऊ नये. शासकीय आरोग्य यंत्रणा औषधसाठ्यासह संपूर्णपणे सज्ज असून लक्षणे आढळल्यास स्वत: पुढे येऊन कोरोना चाचणी करुन घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात कोरोना संदर्भात आढावा बैठक पालकमंत्री श्री. देसाई यांनी घेतली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समिर शेख, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेश गायकवाड  यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, शासकीय रुग्णालये, प्राथमिक रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयातील संपूर्ण यंत्रणा उपचारासाठी लागणाऱ्या यंत्रणांसह सज्ज आहे. तसेच उपचारासाठी लागणारा औषधसाठाही उपलब्ध आहे.  नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी वावरत असताना तोंडवर मास्क लावावे.