गावांकडून पिण्याच्या पाण्याच्या टँकरची मागणी झाल्यास त्वरित पाणी पुरवठा करावा- पालकमंत्री

0
10

सातारा, दि. 6 : उन्हाळ्याचा हंगाम सुरु झालेला आहे. या हंगामात ग्रामीण भागामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू शकते.  ज्या गावाकडून पिण्याच्या पाण्याच्या टँकरची मागणी झाल्यास त्या गावाला त्वरित पुरवठा करावा, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात  पाणी टंचाई संदर्भात  आढावा बैठक पालकमंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समिर शेख, उपजिल्हाधिकारी (रोहयो) विजया यादव आदी उपस्थित होते.

टंचाईच्या काळात करावयाच्या उपाययोजनांचे प्रस्ताव लवकरात लवकर जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करावेत, असे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी तालुक्यातील लोकप्रतिनिधींबरोबर लवकरात लवकर बैठक घेऊन टंचाईसंदर्भात लोकप्रतिनिधींनी सांगितलेल्या उपायोजनांबाबत कार्यवाही करावी.

ज्या ठिकाणी बोरवेलची दुरुस्ती करावयाची असल्यास ती त्वरीत करावी. तसेच विहिरी अधिग्रहण करण्याची वेळ आल्यास तेही करावे. टंचाई कालावधीत मागेल त्या गावाला पिण्याच्या पाण्याचे टँकर उपलब्ध करुन दिले जातील, असेही पालकमंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here