सातारा दि. 16. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात सातारा लोकल बोर्ड इमारतीचे प्रस्तावित नूतनीकरण, भूस्खलनग्रस्त गावांचे पूनर्वसनासाठी जमिनी ताब्यात घेणे व एमएमआरडीए कडून घराचे मॉडेल तयार करणे, वन जमिनींना सौर कुंपण प्रस्ताव शासनास पाठवणे आदी विषयांचा आढावा घेतला.
या आढावा बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, उपवनसंरक्षक महादेव मोहिते, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी श्री. देसाई म्हणाले, भूस्ख्लन, पुरामुळे बाधित झालेल्या नऊ गावातील 614 कुटुंबांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. त्यांच्या घरांच्या कामाचा शुभारंभ सप्टेंबर 2023 मध्ये घेण्यात येणार आहे. तसेच वन विभागाच्या हद्दी जवळील शेतमालांचे वन्य प्राण्यांकडून नुकसान होत आहे. हे नुकसान थांबविण्यासाठी सौर कुंपणाच्या प्रस्तावाला शासनाकडून मान्यता देण्यात येईल.
जिल्हा परिषदेमधील जुन्या लोकल बोर्डाची इमारतीची डागडुजी करून पूर्वी जशी इमारत होती तशीच जुन्या इमारतीचे सौंदर्य व्यवस्थित जतन करण्यात येणार आहे. त्यामध्ये लोकल बोर्डाचे पहिले अध्यक्ष ते शेवटचे अध्यक्ष यांचे छायाचित्रे व कार्यकाल, इतिहास या इमारतीमध्ये लावावे, अशा सूचनाही पालकमंत्री श्री देसाई यांनी दिल्या.