तीन वर्षात महाराष्ट्रातील ११ हजार तरूण भारतीय सेनेत दाखल

नवी दिल्ली,दि.11 :   गेल्या तीन वर्षात देशभरातील1लाख54हजार902तरूण भारतीय सैन्यात दाखल झाले आहेत,महाराष्ट्रातील11हजार866तरुणांचा यात समावेश आहे.

देशातील तरूण मोठ्या प्रमाणात भारतीय सेनेत दाखल झाल्याचे चित्र आहे. भारतीय सेनेत गेल्या तीन वर्षात झालेल्या विविध रिक्त पदांच्या सैन्य भरतीमध्ये30राज्य व केंद्रशासित प्रदेशांतील तसेच नेपाळमधील  सरासरी95टक्के  तरूण दाखल झाले आहेत. यात एकट्या महाराष्ट्रातील11हजार866तरुणांचा समावेश आहे.

वर्ष2016-17मध्ये महाराष्ट्रातील3हजार980तरूण,वर्ष2017-18मध्ये  3हजार836आणि वर्ष2018-19मध्ये4हजार50तरुण भारतीय सैन्यात दाखल झाले आहेत.

भारतीय सैन्यात वर्ष2016-17मध्ये52हजार86तरूण दाखल झाले,वर्ष2017-18मध्ये49हजार438तर वर्ष2018-19मध्ये53हजार378दाखल झाले आहेत. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी आज लोकसभेमध्ये लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे. 

             

000000 

रितेश भुयार /वृत्त वि. क्र.53/दिनांक ११.०३.२०२०