मुंबई, दि. 11 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास‘ कार्यक्रमात ‘विकासपर्वाचे शंभर दिवस‘ या विषयावर मुलाखत घेण्यात आली आहे. या कार्यक्रमात द फ्री प्रेस जर्नलचे राजकीय संपादक श्री.संजय जोग, दै.लोकसत्ताचे राजकीय संपादक संतोष प्रधान व दै.सकाळचे मुख्य प्रतिनिधी संजय मिस्कीन यांचा सहभाग असलेली मुलाखत ‘दिलखुलास‘ कार्यक्रमात गुरुवार दि. 12 आणि शुक्रवार दि. 13 मार्च रोजी राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत तसेच प्रसारभारतीच्या ‘न्यूज ऑन एअर’ या ॲपवरही प्रसारित होणार आहे. निवेदक नरेंद्र बेडेकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.
महिला व बालकल्याण विकास विभागाच्या अनुषंगाने घेण्यात आलेले निर्णय, राज्यातील मत्यसंवर्धनासाठीचे प्रयत्न, आंध्र प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात होत असलेला दिशा कायदा, राज्याच्या हीरक महोत्सवाच्या अनुषंगाने घेण्यात आलेले निर्णय, पाच दिवसांचा आठवडा, पर्यटन विभागाची आतापर्यंतची वाटचाल, मुंबई २४तास हा उपक्रम आदी विषयांवर सविस्तर चर्चा श्री. जोग, श्री. प्रधान व श्री.मिस्कीन यांनी ‘दिलखुलास‘ कार्यक्रमात केली आहे.