दि.16फेब्रुवारी 2020
– डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाचा38वा पदवीदान सोहळा, राज्यपाल राज्यपाल श्री भगत सिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत संपन्न. कृषिमंत्री श्री दादाजी भुसे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. उदय सामंत उपस्थित.
– नाशिक येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत, महाराष्ट्र व गोवा वकील परिषदेतर्फे आयोजित वकील परिषद2020 अंतर्गत ‘जलद व आधुनिक न्यायदानाच्या दिशेने’, या विषयावरील चर्चासत्र संपन्न. परिवहन मंत्री श्री अनिल परब उपस्थित. श्री ठाकरे यांच्याद्वारे यांच्या उपस्थितीत जिल्हा न्यायालयाच्या नूतन इमारतीच्या कोनशिलेचे अनावरण. महत्वाचे मुद्दे- ब्रिटीशकालीन कायद्यात गरजेनुसार बदल आवश्यक, महिलांवर होणाऱ्या अत्याचारांची प्रकरणे फास्ट्र ट्रॅक कोर्टकडे वर्ग करण्याची गरज भासू नये, अशी न्यायव्यवस्था आणि समाज घडविण्याची सर्वांची जबाबदारी, कायद्यापेक्षा संस्कारांना जास्त महत्व, न्यायव्यवस्था, शासन आणि प्रशासनात समन्वय आवश्यक, जिल्हा न्यायालयाच्या इमारत उभारण्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, न्यायमूर्ती घडविणारे पहिले विद्यापीठ महाराष्ट्रात उभे करण्यासाठी सर्व सहकार्य, ॲडव्होकेट वेल्फेअर ट्रस्टच्या मागणीबाबत आणि वकील भवनाबाबत प्रस्ताव सादर केल्यास त्यासाठी सहकार्य करणार.
-नाशिकयेथेमुख्यमंत्रीश्रीउद्धवठाकरेयांचीवडाळानाकापरिसरातीलद्वारकामाईबचतगटातर्फेचालविण्यात येत असलेल्याशिवभोजनकेंद्रासभेट.
– स्व.आर.आर.पाटीलयांच्यापाचव्यापुण्यतिथीनिमित्तअंजनी(ता.तासगाव)येथीलत्यांच्यासमाधीस्थळीपुष्पहारअर्पणकरूनउपमुख्यमंत्री श्री. अजितपवारयांच्याद्वारेअभिवादन.पालकमंत्रीजयंतपाटील,ग्रामविकासमंत्रीहसनमुश्रीफ,सहकारवपणनमंत्रीबाळासाहेबपाटीलउपस्थित. स्व.आर.आर.पाटीलयांचेसमाधीस्थळ,निर्मलस्थळम्हणूनलवकरचविकसीतकरण्याची श्रीपवारयांची घोषणा
– इस्राईल आणि महाराष्ट्राचे घनिष्ठ संबंध येणाऱ्या काळात अधिक वृद्धिंगत व्हावे यासाठी ठाणे,रायगड आणि मुंबई येथे जुईश वारसा स्थळे विकसित करणार असल्याची, सांस्कृतिक कार्यमंत्री श्री अमित देशमुख यांची घोषणा, जेरुसलेम – मुंबई महोत्सवाचे श्री देशमुख आणि जेरुसलेमचे महापौर मोशे लियोन यांच्या हस्ते उद्घाटन.
– आरोग्य मंत्री श्री राजेश टोपे यांच्याद्वारे प्रसृत माहिती – राष्ट्रीय बाल स्वाथ्य कार्यक्रमांतर्गत राज्यात गेल्या वर्षभरात अंगणवाडीतील64लाख71हजार मुलांची तर1कोटी21लाख शालेय विद्यार्थ्यांची तपासणी, योजना सुरू झाल्यापासून सुमारे17हजार विद्यार्थ्यांवर मोफत हृदय शस्त्रक्रिया, गेल्या वर्षभरात तीन हजार मुलांवर हृदय शस्त्रक्रिया.
– राज्यातील56जण करोना निगेटिव्ह असल्याची आरोग्यमंत्री श्री राजेश टोपे यांची माहिती.
दि17फेब्रुवारी2020
– मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सिंधुदुर्ग जिल्हा आढावा तसेच पर्यटन विकासाबाबत बैठक. उद्योग व खनिकर्म मंत्री श्री. सुभाष देसाई,पालकमंत्री श्री उदय सामंत,उपस्थित. मुख्यमंत्र्यांचे निर्देश- तिलारी प्रकल्प क्षेत्रात पर्यटन विकासासाठी वन संवर्धन राखीव करून पर्यटनाच्या सुविधा उभारण्याबाबत एकत्रित प्रस्ताव तयार करा, जिल्ह्यातील सर्व रिक्त पदांचा आढावा संबंधित विभागांनी घेऊन पदे भरण्याविषयीची कार्यवाही तातडीने सुरू करा, आकारीपड प्रकरणी न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे सम प्रमाणात वाटणी करण्यासाठी कार्यवाही सुरु करा, धूप प्रतिबंधक बंधारे हे दगडी बांधण्यासाठी प्रस्ताव करा. सागरी महामार्गाच्या काँक्रिटीकरणाऐवजी कमी खर्चात टिकाऊ रस्ते निर्मितीसाठी बॅच मिक्सचा वापर करा. कवी मंगेश पाडगावकर यांच्यासह अन्य महनीय व्यक्तींच्या स्मारकांच्या उभारणीबाबत प्रस्ताव द्या, त्यामध्ये त्या व्यक्तीविशेषांचा समावेश राहील याची काळजी घ्या. महिनाभरात जिल्ह्याचा परिपूर्ण पर्यटन अराखडा सादर करा. तिलारी जलविद्युत प्रकल्पाच्या मागील क्षेत्रामध्ये वन्यजीव संवर्धनासाठी राखीव जंगल यासह इको टुरिझम निर्मिती प्रकल्पाचा प्रस्ताव तातडीने सादर करा. कृषी कर्जमाफीच्या धर्तीवर मच्छिमारांसाठी कर्जमाफीचा प्रस्ताव सादर करा, सर्जेकोट,राजकोट,नवाबाग येथील जेटींची उभारणी करण्यासाठी कार्यवाही पूर्ण करा. मच्छिमारांच्या डिझेल अनुदानासाठी 5 कोटी 40 लाख रुपयांचा निधी लवकर द्या. माकडतापाची नवी लस मिळण्याबाबत केंद्राकडे प्रस्ताव पाठवा. कुडाळ येथील महिला व बाल रुग्णालयासाठी लागणारा निधी तातडीने द्या. काजू व फळ प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी धोरण ठरवा. इतर मुद्दे- एलईडी मासेमारीविरोधात येत्या अधिवेशनात राज्याचा कडक कायदा निर्माण केला जाईल. खासगी वनांबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये राज्य सरकारची भूमिका मांडण्यासाठी वरिष्ठ विधिज्ञ नियुक्त करण्यात येईल. कबुलायतदार गावकार प्रकरणी जिल्ह्यात महाराष्ट्र शासनाच्या नावे असलेल्या 658 हेक्टर जमिनीबाबत एकत्रित बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल. रेडी व आरोंदा बंदर पुन्हा शासनाकडे घेण्याबाबत विचार करण्यात येईल,जिल्ह्यात अद्ययावत क्रीडासंकुल उभारण्यात येईल. अरुणा,नरडवे,सी वर्ल्ड सारखे रखडलेले प्रकल्प मार्गी लावणार, सी वर्ल्ड सारख्या प्रकल्पांसाठी खासगी गुंतवणूकदार पुढे आल्यास त्यासाठी भांडवली अनुदान देणार.
– म्हाडाच्या माध्यमातून कामाठीपुराचा समूह पुनर्विकास करण्याचे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे सूतोवाच.
– आंगणेवाडी यात्रेच्या निमित्ताने श्री भराडी देवीचे मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांच्याद्वारे दर्शन. 22 कोटी 12 लाख खर्चाच्या मसुरे (आंगणेवाडी) लघुपाटबंधारे योजनेच्या प्रशासकीय मान्यतेचे पत्र श्री ठाकरे यांच्याद्वारे पालकमंत्री श्री उदय सामंत यांच्याकडे सुपूर्द. योजनेच्या कोनशिलेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण.
– मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते, पोलादपूर तालुक्यातील उमरठ येथे महाराष्ट्र शासन,जिल्हा परिषद रायगड आणि नरवीर तानाजी मालुसरे सोहळा समिती यांच्यावतीने नरवीर तानाजी मालुसरे यांच्या350व्या पुण्यतिथीनिमित्त समाधी वास्तूचा लोकार्पण. पर्यटन राज्यमंत्री कुमारी आदिती तटकरे उपस्थित.
– मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गणपतीपुळे येथील 102 कोटींच्या विकास आराखड्याचे भूमीपूजन. उद्योगमंत्री सुभाष देसाई,पालकमंत्री ॲड अनिल परब,उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत उपस्थित.
– नाविन्यता सोसायटीतर्फे तरुण आणि नवउद्योजकांच्या कल्पनांना चालना देण्यासाठी लवकरच आयोजित‘महाराष्ट्र स्टार्टअप’सप्ताहात सहभागी होण्याची शेवटची तारीख दि. 1 मार्च 2020. संपर्क- संकेतस्थळ-www.msins.in/startup-week, ईमेल-team@msins.in, दूरध्वनी-०२२-३५५४३०९९
-‘सारथी’संस्थेच्या विद्यार्थ्यांना तीन दिवसात विद्यावेतन देण्याची, बहुजन कल्याण विभागाचे मंत्री श्री. विजय वडेट्टीवार यांची घोषणा, त्यामुळे विद्यार्थ्यांचे आंदोलन मागे.
– राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (बारावी) देणा-या विद्यार्थ्यांना, शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्याद्वारे शुभेच्छा. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे,नागपूर,औरंगाबाद,मुंबई,कोल्हापूर,अमरावती,नाशिक,लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत बारावीची परीक्षा 18 फेब्रुवारी 2020 ते 18 मार्च 2020 या कालावधीत आयोजित. 15 लाख 5 हजार 027 विद्यार्थ्यांची परीक्षेसाठी नोंदणी, 8 लाख 43 हजार 552 विदयार्थी आणि 6 लाख 61 हजार 325 विद्यार्थीनींचा समावेश. 9 हजार 923 कनिष्ठ महाविद्यालयांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी. परीक्षेसाठी राज्यात 3 हजार 36 परीक्षा केंद्रे.9विभागीय मंडळात समुपदेशन करण्यासाठी10 समुपदेशकांची नियुक्ती. परीक्षेच्या काळात गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी 273 भरारी पथके.
– बारावीच्या परीक्षेसाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री उदय सामंत आणिपरिवहन मंत्री ॲड. अनिल परबयांच्याद्वारे विद्यार्थ्यांना शुभेच्छा.
– विविध रुग्णालयात निरीक्षणाखाली असलेल्या ६४ जणांपैकी ६० जणांचा प्रयोगशाळा नमुना अहवाल कोरोना निगेटिव्ह. ५९ जणांची रुग्णालयातून मुक्तता. सध्या पाच जण निरीक्षणाखाली. बाधित भागातून राज्यात आलेल्या एकूण २२० प्रवाशांपैकी १३८ प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याद्वोर प्रसृत.
– मुंबई शहरातून वाहणाऱ्या पोईसर आणि दहिसर नद्यांचे प्रदुषण कमी करण्यासाठी गतीने काम करण्याचे, पर्यावरण मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांचे निर्देश.
दि.18फेब्रुवारी2020
मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासकामांची आढावा बैठक. राज्यात असणा-या देवस्थान समितीच्या जमिनीचे हस्तांतरण सुलभरीत्या व्हावे,यासाठी महिन्याभरात धोरणात्मक निर्णय घेण्याची श्री ठाकरे यांची घोषणा. उद्योग व खनिकर्म मंत्री सुभाष देसाई,रत्नागिरीचे पालकमंत्री तथा परिवहन मंत्री अनिल परब सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत उपस्थित. महत्वाचे मुद्दे- रत्नागिरी जिल्ह्याला पर्यटन जिल्हा घोषित करण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधिंनी पालकमंत्र्यांसमवेत एकत्रित बसून चर्चा करा. राजापूर शहर आणि चिपळूणमध्ये पूर अडविण्यासाठी नदी लगत संरक्षण भिंत उभारण्यास मान्यता. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पद भरतीच्या चक्राकार पध्दतीत या दोन जिल्ह्यांना प्राधान्यक्रम देणार. रुग्णांना नेण्यासाठी108क्रमांकाच्या उपलब्ध सुविधेव्यतिरिक्त पर्यायी व्यवस्था नजिकच्या काळात निर्माण करणार, रत्नागिरी जिल्ह्याला रायगडशी जोडणारा पूल मेरी टाईम बोर्डाच्यावतीने सार्वजनिक बांधकाम विभागच्या निधीतून पूर्ण करणार, रत्नागिरी जवळील निवळी घाट तसेच इतर रस्त्यांच्या कामाला प्राधान्य देणार.
– अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत, विकेंद्रीत खरेदी योजनेअंतर्गत धानापासून प्राप्त झालेल्या तांदळासंदर्भात आढावा बैठक. विकेंद्रीत खरेदी योजनेअंतर्गत धानाची आवक जास्त झाल्याने गोदामाची कमतरता भासत असल्याने पर्यायी व्यवस्था म्हणून बाजूच्या जिल्ह्यातील गोदामांचा वापर करण्याचे तसेच जिल्ह्याप्रमाणे साठवणुकीची क्षमता वाढवण्याचे, श्री भूजबळ यांचे निर्देश.
– सोलापूर शहर पाणीपुरवठा योजनेसंदर्भात उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक. उजनी धरणातून सोलापूर शहराला पाणीपुरवठा योजनेसाठी जिल्हाधिकारी,मनपा आयुक्त तसेच संबंधित सर्व यंत्रणांनी येत्या 15 दिवसात 110 किलोमीटर जागेचे सीमांकन करण्याचे श्री पवार यांचे निर्देश.
– गृहनिर्माण मंत्री श्री जितेंद्र आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली मागठणे एम. एच. बी. कॉलनी, बोरिवली येथील संक्रमण शिबिरातील रहिवाशांच्या अडचणीच्या संदर्भात बैठक. मागाठणे एम. एच. बी. कॉलनी बोरिवली येथील संक्रमण शिबिरातील रहिवाशांना येत्या दीड वर्षात ‘म्हाडा’तर्फे हक्काचे घरे देण्याचे,श्री आव्हाड यांचे सूतोवाच.
– मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांची सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट, किल्ल्याची पाहणी, किल्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरातील शिवछत्रपतींचे आणि भवानी मातेच्या मंदिरातील भवानी मातेचे दर्शन. रत्नागिरीचे पालकमंत्री तथा परिवहन मंत्री ॲड. अनिल परब उपस्थित.
– मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली चिपी विमानतळासंदर्भात उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी बैठक.चिपी विमानतळासाठी आवश्यक सर्व पायाभूत सुविधांची कामे पूर्ण करुन येत्या1मे पर्यंत विमानतळकार्यान्वित करण्याचे श्री ठाकरे यांचे निर्देश. उद्योग मंत्री सुभाष देसाई,परिवहन मंत्री ॲड. अनिल परब,पालकमंत्री उदय सामंत उपस्थित.
– मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाच नव उद्योजकांना उद्योग मंत्री श्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंजुरी पत्रांचे वाटप. पालकमंत्री श्री उदय सामंत,परिवहन व संसदीय कार्यकमंत्री ॲड. अनिल परब,उपस्थित.
– लंडन येथील बकिंगहॅम पॅलेसच्या धर्तीवर महाराष्ट्र पोलीस मुख्यालयात’चेंज ऑफ गार्ड’ही अभिनव संकल्पना, महाराष्ट्र दिनापासून सुरू करण्याची गृहमंत्री श्री अनिल देशमुख यांची घोषणा.
– सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितत मंत्रालयात महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाची बैठक. महामंडळाच्या विविध योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे व नवनवीन योजनांचे प्रस्ताव दाखल करण्याचे निर्देश.
– सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत माणगांव परिषद शताब्दी महोत्सव आयोजन करण्याबाबत बैठक. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या उपस्थितीत व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली माणगांव (ता.हातकणंगले) येथे21आणि22मार्च1920रोजी पहिली ऐतिहासिक परिषद भरली होती. याचा शताब्दी महोत्सव समारंभ21मार्च, 2020रोजी माणगांव (ता.हातकणंगले) येथे आयोजित करण्याची श्री मुंडे यांची घोषणा. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ,गृह राज्यमंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील उपस्थित.
– सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्री श्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत, चेंबुर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन व एक हजार क्षमतेच्या मुलांचे शासकीय वसतीगृह बांधकामाबाबत आढावा बैठक. दोन्ही कामे सहा महिन्यात पूर्ण करण्याचे विकासकाला निर्देश.
– मेडिगट्टा धरणामुळे गडचिरोलीतील बाधित गावांबाबत तेलंगणा सरकारशी चर्चा करणार असल्याची, जलसंपदा मंत्री श्री जयंत पाटील यांची घोषणा.
– एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या शिष्टमंडळासोबत उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांची बैठक. सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री. राजेश टोपे,शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड उपस्थित. या बँकेने शिक्षण,आरोग्य क्षेत्राचे बळकटीकरणासाठी सहकार्य करण्याचे श्री पवार यांची सूचना.
– शिवभोजन योजनेचा विस्तार, थाळीची संख्या दुप्पट;१८ हजारांवरुन ३६ हजार, सध्या प्रत्येक शिवभोजन केंद्रासाठी असलेले कमाल १५० थाळींचे उद्दिष्ट २०० थाळी पर्यंत वाढवणार, १८ फेब्रुवारी रोजी १४८ केंद्रावर १६ हजार २३७ लोकांद्वारे शिवभोजन योजनेतील थाळीचा आस्वाद.
– राज्यातील ६६ जण कोरोना निगेटिव्ह, पाच जण रुग्णालयात निरीक्षणाखाली असल्याची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती.
– इतर राज्यातील अवैधरीत्या गुटखा महाराष्ट्रात आढळल्यास त्या विषयी तक्रार करण्याचे, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे आवाहन. यासाठी टोल फ्री क्रमांक 1800 222 365,दूरध्वनी- 022-26592361 ते 65 किंवाcomm.fda-mah@nic.in या ईमेल पत्त्यावर तक्रार केल्यास तातडीने कारवाई. गुटखाबंदी लागू झाल्यापासून आतापर्यंत एकूण सुमारे 226 कोटी 53 लाख किंमतीचा गुटखा व तत्सम प्रतिबंधीत अन्न पदार्थांचा साठा जप्त. 4782 प्रकरणी गुन्हे दाखल. दोषीं विरुद्ध न्यायालयात एकूण 6206 खटले दाखल. गुटखा वाहतूक करणाऱ्या वाहनाचा परवाना रद्द करण्याचा निर्णय.
– वरळी मतदार संघातील रस्ते वाहतुकीसंदर्भात पर्यटन व पर्यावरण मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक, मंत्रीमहोदयांचे निर्देश- दैनिक शिवनेर,जे आर बोरिचा,बिजी खेर मार्ग येथे अनधिकृत पार्किंगवरील कारवाई करा, जी/दक्षिण विभागातील ट्राफिक व्हॅल्यूमचा अभ्यास करून अहवाल सादर करा,जी/दक्षिण विभागातील प्रगतिपथावरिल रस्त्याची कामे १५ मे2020पूर्वी पूर्ण करा, सर्व जंक्शनची कामे ३१ मार्च २०२० पूर्वी पूर्ण करा,जी/दक्षिण विभागात यापूर्वी लावलेली सर्व नादुरुस्त रेलिंग काढा, पदपथांवर काँकिटच्या कुंड्या सौंदर्यीकरण करा.
– पोलीस दलात उल्लेखनीय सेवा बजावल्याबद्दल राष्ट्रपतींकडून जाहीर‘पोलीस शौर्यपदक’, ‘उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक’आणि गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदकांचे राज्यपाल श्री भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते वितरण. गृहमंत्री अनिल देशमुख,गृह राज्यमंत्री (शहरे) सतेज पाटील,गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई उपस्थित.
– दक्षिण अफ्रिकेच्या मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूत अँड्रिया कून यांची राज्यपाल श्री. भगत सिंह कोश्यारी यांच्या सोबत बैठक. मुंबई- जोहान्सबर्ग थेट विमानसेवा सुरु करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आँड्रिया यांचे सूतोवाच.
– क्रीडा व युवक कल्याण मंत्री श्री सुनील केदार आणि क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री कुमारी आदिती तटकरे यांच्याद्वारे2018-19 च्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांची घोषणा, पुणे येथील पंढरीनाथ तथा अण्णासाहेब तुकाराम पठारे यांना जीवन गौरव ;औरंगाबादचे सागर राजीव बडवे यांना साहसी क्रीडा पुरस्कार, 63 व्यक्तींची पाच गटातून पुरस्कारासाठी निवड
– पर्यावरण मंत्री श्री.आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत दहिसर भागातील विविध समस्या संदर्भात बैठक. मंत्रीमहोदयांचे निर्देश- दहिसर (पूर्व) मधील वाहतूक कोंडी निवारणासाठी बसेसच्या फेऱ्या वाढवा, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सुरक्षित व स्वच्छ ठेवण्याकरिता कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करा, दहिसर परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढला असल्याने परिणामकारक औषध फवारणी करा.
दि.19 फेब्रुवारी, 2020
-छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात जलसंपदा मंत्री श्री.जयंत पाटील यांच्याद्वारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन.
-छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विधानपरिषदेचे सभापतीश्रीरामराजे नाईक-निंबाळकर आणि उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्यद्वारेविधानभवन प्रांगणातील शिवाजी महाराज यांच्यासिंहासनाधिष्ठीतपुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन.
-मुख्यमंत्रीश्रीउद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्रीश्रीअजित पवार यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव किल्ले शिवनेरीवर उत्साहात साजरा,अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ,सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे,माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री आदिती तटकरेउपस्थित.छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसापुढे नेण्यासाठी कटिबद्धअसल्याचे श्री ठाकरे यांचे प्रतिपादन. शिवनेरी परिसरातील विकास कामांसाठी तातडीने23कोटी रुपये उपलब्ध करूनदेण्याची उपमुख्यमंत्र्याची घोषणा. मराठा आरक्षणाच्यावेळी दाखल झालेले गुन्हे कायद्याच्या चौकटीत राहून मागे घेण्यासाठी प्रयत्न केले जातील.ज्या गुन्ह्यात शासकीय मालमत्ता किंवा सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले नाही,ते गुन्हे नियमांच्या अधीन राहून मागे घेतले जातील असे श्री पवारांकडून सूतोवाच.
– राज्यपाल श्री भगत सिंह कोश्यारी यांच्याद्वारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवाजी पार्क येथे, मुंबई महानगरपालिकेमार्फत आयोजित शिवजयंती उत्सवानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन
– राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते डॉ. मंजूषा कुलकर्णी लिखित ‘अणुविज्ञानातील झंझावात डॉ.अनिल काकोडकर‘ या पुस्तकाचे प्रकाशन
मंत्रींमंडळ निर्णय
· राज्यातील सर्व शासकीय व अनुदानीत शाळांमधील 6 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांमधील दृष्टीदोषनिवारण्यासाठी त्यांना मोफत चष्मे पुरविण्यास मान्यता.
· महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीकरिता 10 हजार कोटी इतका निधी
· आकस्मिकता निधी अग्रीमाद्वारे उपलब्ध करून देण्यास मान्यता.
· निरा देवघर व गुंजवणी धरणाचे कालवे कार्यान्वित नसल्यामुळे विना वापर राहणारे पाणी समन्यायीतत्वावर तात्पुरत्या स्वरुपात निरा उजवा आणि डावा कालवा येथील लाभक्षेत्रास वाटप करण्याचा निर्णय.
– अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कोंभाळणे येथे वास्तव्यास असणाऱ्या बीजमाता राहीबाईंची कृषीमंत्री श्री दादाजी भुसे यांच्याद्वारे भेट, जुन्या वाणांच्या संवर्धनाचे काम शेतकऱ्यांपर्यंत नेण्याची घोषणा.
– दिल्ली,मानेसर येथे14दिवसाच्या विलगीकरणानंतर वुहानवरुन आलेले महाराष्ट्रातील36प्रवासी राज्यात परतल्याची,आरोग्यमंत्री श्री राजेश टोपे यांची माहिती.
– किल्ले शिवनेरी व परिसर विकासाकरिता23कोटी रुपयांचा निधी देण्याबरोबरच गडावरील शिवसंस्कार सृष्टी आणि रोप वे उभारणीची कामे मार्गी लावण्याची, जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन आवारात आयोजित शिवजयंती उत्सव कार्यक्रमात उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांची घोषणा. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, सार्वजिनक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, पर्यटन, माहिती व जनसंपर्क विभागाच्या राज्यमंत्री आदिती तटकरे उपस्थित.
– सैन्य दलाच्या जवानांशी दुर्व्यवहार केल्याप्रकरणी महाराष्ट्र सदनातील अधिकाऱ्यास राजशिष्टाचार मंत्री श्री आदित्य ठाकरे यांच्या निर्दशनानुसार तातडीने पदावरुन कार्यमुक्त
दि.20फेब्रुवारी, 2020
– हॉटेल ट्रायडंट येथे डिप्लोमॅटिक कम्युनिटी यांच्यामार्फत विविध देशांच्या महावाणिज्य दुतांच्या परिषदेला पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री श्री आदित्य ठाकरे उपस्थित. उद्योग,पर्यटन आदी क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र शासनमार्फत सर्वतोपरी सहकार्य करण्याची श्री. ठाकरे यांची ग्वाही.
– वनमंत्री श्री संजय राठोड यांची भोपाळ येथील भारतीय वन व्यवस्थापन संस्थेस भेट, वन्य जीवांमुळे होणाऱ्या नुकसानी संदर्भात मदतीसाठी केंद्राकडे संयुक्त प्रस्ताव पाठवण्याचे सूतोवाच.
– सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) संचालक मंडळाची बैठक, राज्यमंत्री श्री संजय बनसोडे उपस्थित. मंत्रीमहोदयांचे निर्देश- रस्ते, पुल, उड्डाणपुल तयार करताना त्यांच्या सौंदर्यावर अधिक भर द्या. रस्त्यांच्या दुभाजकांवर झाडे लावा, शोभीवंत कुंड्या ठेवून त्यांची निगा राखा, महामंडळाच्या उड्डाणपुलांचा आढावा घ्या. या पुलांची रंगरंगोटी, सौंदर्यीकरण एकसूत्रतेने करा, उड्डाणपुलाखाली डेब्रिज, सामान राहणार नाही याची दक्षता घ्या. पुलांखालचा भाग स्वच्छ आणि मोकळा राहावा यासाठी प्रयत्न करा. टोल नाक्यांवरील गर्दी कमी करण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करा. लेनची संख्या वाढवा. हॅण्डहेल्ड मशीनधारकांची संख्या वाढवा. कल्याण-शीळफाटा रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करा. रस्त्यांवरील माती, डेब्रीज काढून टाका व रस्ते स्वच्छ आणि सुंदर करा. रस्त्यांच्या दुभाजकांवर असेल्या कुंड्यांना रंगरंगोटी करा पावसाळ्यामध्ये पुलांवर खड्डे पडतात त्यामुळे अपघात होऊ शकतात. अशा पुलांची तातडीने दुरुस्ती करा.
– वुहानवरुन आलेले महाराष्ट्रातील ५ जण राज्यात परतले, राज्यात ४ जण निरीक्षणाखाली -आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याद्वारे माहिती प्रसृत.
– अल्पसंख्याक विकास मंत्री श्री. नवाब मलिक यांच्या उपस्थितीत अल्पसंख्याक समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी विविध सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत बैठक.अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी राज्यभरात ‘युपीएससी’च्या तयारीकरिता प्रशिक्षण योजना, विद्यावेतनात२ हजारांवरुन ४ हजार रुपयांपर्यंत वाढ, संबंधीत प्रशिक्षण संस्थांना दिल्या जात असलेल्या निधीत ५० हजार रुपयांपर्यंत वाढ.
– कृषीमंत्री श्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह येथे नाबार्ड बँकेच्या वतीने राज्य क्रेडिट सेमिनार संपन्न. महत्वाचे मुद्दे- शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी कृषी यांत्रिकीकरणात नाविन्यपूर्ण उपकरणांचा समावेश करणार ,‘लॅब ते लॅण्ड’ पद्धतीने कृषी क्षेत्राच्या विकासावर भर, छोट्या शेतकऱ्यांना कर्ज मिळावे यासाठी बँकांनी अधिक लक्ष देण्याची गरज, महिला बचतगटांचे सक्षमीकरण करण्याकरिता बँकांकडून जास्तीत जास्त मदत अपेक्षित. ग्रामीण भागांमध्ये बँकांच्या शाखांचे जाळे वाढवा. ठिबक सिंचन, शेततळे, अस्तरीकरण या माध्यमातून शाश्वत उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करण्यावर भर, शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ देताना डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर अधिकाधिक वापर,
– कौशल्य विकास मंत्री श्री. नवाब मलिक यांच्याद्वारे, अर्थसहाय्यित, स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर कौशल्य विद्यापीठांची स्थापना करण्यासाठी समिती गठीत. अध्यक्षपदी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्त यांची नियुक्ती. कार्यकक्षा- या विद्यापीठांच्या अधिनियमाचे प्रारुप तयार करणे, संस्थांमार्फत सुरु असलेल्या कौशल्य विकास कार्यक्रमांना प्रमाणपत्र, पदविका, पदवी याबाबतची मान्यता देण्याबाबत अधिनियमामध्ये तरतूद करणे, अधिनियमांतर्गत स्थापन करावयाच्या अभिमत विद्यापीठांकरीता विद्यापीठ अनुदान आयोगाकडे प्रस्तावांची शिफारस करण्याबाबत तरतूद करणे
– उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत, प्रवेश नियामक प्राधिकरण आणि राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे आयोजित आढावा बैठक. मंत्रीमहादयांचे निर्देश- विद्यार्थी, पालक आणि संस्थाचालक यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी विभागानुसार शैक्षणिक संवाद कार्यक्रम आयोजित करा, विद्यार्थांच्या जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी संदर्भात संबंधित विभांगांची एकत्र बैठक घेऊन तांत्रिक अडचणी सोडवा,अभियांत्रिकी आणि वैद्यकीय प्रवेशासाठी असणारी सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) प्रवेश प्रक्रिया सुरळीत पार पाडा. यासाठी एका समितीचे स्थापन करा, वेगवेगळया सामाईक परीक्षेसाठी विद्यार्थ्यांकडून तांत्रिक अडचणींमुळे दोनवेळा आकारणी केलेले शुल्क परत करा, विद्यार्थ्यांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी तत्काळ दूर करण्यासाठी मार्गदर्शक आणि तक्रार निवारण मंच स्थापन करा, ऑनलाईन अर्जप्रणाली सुलभ आणि सोपी बनवा, विद्यार्थ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वरूपाची व्यवस्था तयार करून विशिष्ट वेळेच्या मर्यादेत त्यांच्या समस्यांचे निराकरण करा.
– दिल्ली येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री अशोक चव्हाण यांचा पत्रकारांशी संवाद – महत्वाचे मुद्दे- एशियन डेव्हल्पमेंट बँकेकडून मिळणा-या निधीमधून राज्यातील रस्ते विकासाची कामे घेणार, यासाठी राज्यातील रस्ते विकासाचा निश्चित कार्यक्रम ठरवणार, अधिक रहदारी असणा-या रस्त्यांचा विकास प्राथमिकतेने करणार, रस्त्यांचे जाळे अधिक मजबूत करण्यासाठी अतिशय महत्वाचे व अधिक रहदारीच्या रस्त्यांना चिन्हित करणार, यात राज्यातील महामार्ग, इतर राज्यांना जोडणारे महामार्ग, जिल्ह्यांना, तालुक्यांच्या मुख्यालयांना जोडणारे रस्ते, तीर्थस्थळांना जोडणा-या रस्त्यांचा समावेश करणार.
– कान्फडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री(सीआयआय.) रिअल इस्टेट परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून गृहनिर्माण मंत्री श्री जितेंद्र आव्हाड उपस्थित. सर्वसामान्य माणसांचे घराचे स्वप्न साकार करण्यासाठी विकासकांनी पुढाकार घेऊन शासनास सहकार्य करण्याचे श्री आव्हाड यांचे आवाहन.
– आंध्र प्रदेशला भेट देऊन आंध्रपदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. जगन मोहन रेड्डी आणि गृहमंत्री श्रीमती मेखाथोटी सुचरिता यांच्या सोबत, दिशा कायद्याबद्दल गृहमंत्री श्री अनिल देशमुख यांची विस्तृत चर्चा. दिशा कायद्याविषयी अहवाल देण्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक श्रीमती दोरजे यांच्या नेतृत्वाखाली5 अधिकाऱ्यांचे पथक नियुक्त. त्यांच्या अहवालावर चर्चा करून मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा विषय मांडण्यात येईल. अधिवेशनात याबाबत कायद्या आणण्यासाठी प्रयत्न.
दि.21फेब्रुवारी, 2020
– मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांची प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत दिल्ली येथे भेट. पर्यावरण तथा राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित. महाराष्ट्राला, वस्तू व सेवाकर (जीएसटी) परतावा तातडिाने मिळावा, पीक विमा योजनेचा लाभ राज्यातील सर्वच शेतकऱ्यांना मिळावा, अशी श्री ठाकरे यांच्याद्वारे पंतप्रधानांना विनंती.
– राज्यात77जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनासाठी निगेटीव्ह, चार जण सध्या निरीक्षणाखाली असल्याची, आरोग्यमंत्री श्री राजेश टोपे यांची माहिती.
– लोकशाही दिनाच्या धर्तीवर राज्यात आता महिन्याच्या पहिल्या सोमवारी शिक्षणदिन, शाळास्तरावरील तक्रारींच्या निराकरणासाठी विविध समित्यांची स्थापना करणार असल्याची, शालेय शिक्षणमंत्री श्रीमती वर्षा गायकवाड यांची घोषणा.
– पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते सिद्धेश्वर रत्नेश्वर यात्रेत, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत प्लास्टिक पिशवी, थर्माकोलमुक्त महाराष्ट्र जनजागृती अभियानाच्या सचित्र मार्गदर्शिका व कापडी पिशवी वाटप केंद्राचे उद्घाटन.
– मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठी भाषा विभागाच्या राज्य मराठी विकास संस्थेतर्फे दि. 23 ते 26 फेब्रुवारी दरम्यान,‘भाषा भरजरी तिचा उत्सव जरतारी’या विशेष विविध कार्यक्रमांचे आयोजन.
– नंदुरबार येथील एकलव्य मॉडेल रेसिडेंशिअल स्कूल येथे विद्यार्थ्यांशी राज्यपाल श्री भगत सिंह कोश्यारी यांची बैठक. शिस्त,परिश्रम,उद्दिष्ट,मातृभाषेचे ज्ञान आणि गुरुजनांचा आदर या पंचसूत्रीच्या आधारे विद्यार्थ्यांनी जीवन यशस्वी करण्याचे,राज्यपालांचे प्रतिपादन.
-उच्च व तंत्रशिक्षण मंत्रीश्रीउदय सामंतयांच्या उपस्थितीत,एमआयटी वर्ल्ड पिस युनिव्हर्सिटी, पुणे, एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि भारतीय छात्र संसद फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजितनवी दिल्ली येथील विज्ञान भवनात 10व्या भारतीय छात्र संसदेचेतिसरेसत्रसंपन्न.महाराष्ट्रात सायबर,क्रीडा विद्यापीठ उभारणार असल्याची, श्रीसामंत यांची माहिती.
– दिल्ली येथे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री उदय सामंत यांची दिल्लीचे उपमुख्यमंत्री तथा शिक्षण मंत्री मनिष सिसोदिया यांच्यासोबत बैठक. महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये होणार शैक्षणिक देवाण-घेवाण करण्याची श्री सामंत यांची घोषणा.
दि २२. फेब्रुवारी २०२०
– राज्यपाल श्री भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते, इंडियन जर्नल ऑफ ऑप्थॉलमॉलॉजी (आयओजे) ला 60 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्त, राजभवन येथे टपाल तिकिटाचे अनावरण.
– उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली,सेवाग्राम-पवनार-वर्धा विकास आराखड्याच्या अंमलबजावणीसंदर्भात बैठक.पालकमंत्री श्रीसुनील केदारउपस्थित. जिल्हा विकास योजनेंतर्गत नागपूरला १००कोटी आणि वर्ध्याला २५कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी देण्याच्या निर्णय. उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश-वर्धा, सेवाग्राम व पवनार परिसराचे राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय महत्वं लक्षात घेऊन विकासकामांना वेग द्या, कामांच्या दर्जाशी तडजोड करु नका,वर्धा शहरातील, जिल्ह्यातील शासकीय कार्यालये, निवारसास्थाने, पर्यटनस्थळांच्या ठिकाणी स्वच्छतेवर विशेष भर द्या.–अवैध ऑनलाईन लॉटरीमुळे राज्याच्या महसुलात होत असलेली घट रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांचे निर्देश. अवैध ऑनलाईन लॉटरी नियंत्रणाच्या अभ्यासासाठी पोलीस ववित्त विभागाचे अधिकारी पश्चिम बंगालला जाणार.