- नाव : अॅड. अनिल दत्तात्रय परब
- जन्म : 31 डिसेंबर 1964.
- जन्मठिकाण : मुंबई,
- शिक्षण : बी. कॉम. एलएल.बी.
- ज्ञात भाषा : मराठी, हिंदी व इंग्रजी.
- वैवाहिक माहिती : विवाहित, पत्नी श्रीमती सुनिता.
- अपत्ये : एकूण 2 (दोन मुली).
- व्यवसाय : उद्योग.
- पक्ष : शिवसेना.
- मतदारसंघ : महाराष्ट्र विधानसभा सदस्यांद्वारा निर्वाचित.
- इतर माहिती : संघटनेच्या माध्यमातून सामाजिक व सांस्कृतिक कार्य;गरीब, गरजु विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्यांचे वाटप;गरीब रुग्णांना सर्वतोपरी मदत, दहिहंडी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव कार्यक्रमांचे आयोजन, आरोग्य तपासणी, रक्तदान शिबीरांचे आयोजन; सामान्य माणसांना कायदेविषयक मोफत सल्ला; विविध क्रीडा स्पर्धांचे तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन; बांद्रा येथील शासकीय वसतीगृहाच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न; स्पर्धा परिक्षांसाठी मार्गदर्शन शिबीराचे आयोजन;2001 पासून शिवसेना विभाग प्रमुख, पक्षाच्या कायदेविषयक कामाची जबाबदारी, पक्षाच्या सर्व आंदोलनात सक्रिय सहभाग; 2004-2010, 2012-2018 सदस्य, महाराष्ट्र विधानपरिषद ; जुलै 2018 मध्ये विधानपरिषदेवर फेरनिवड.